दहावीच्या विद्यार्थ्याकडून ६२५ पैकी ६२४ मार्क मिळूनही रिवॅल्यूएशनला पेपर आणि...

 त्याने पेपर रिव्हॅल्युएशनला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आलेल्या निकाल सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा होता.

Updated: Jun 11, 2018, 07:37 PM IST
दहावीच्या विद्यार्थ्याकडून ६२५ पैकी ६२४ मार्क मिळूनही रिवॅल्यूएशनला पेपर आणि... title=

बंगळूर : दहावीच्या परिक्षेचे निकाल नुकतेच लागले आहेत. काहींना अपेक्षेपेक्षा जास्त मार्क मिळाले तर काहींचा नव्वदीपार टक्केवारी मिळूनही अपेक्षाभंगच झालायं. कर्नाटकमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार समोर आलायं. १० वी परीक्षेत टॉपर असलेल्या मोहम्मद कैफ मुल्लाला याला ६२५ पैकी ६२४ मार्क मिळाले. तरीही त्याने आपला पेपर रिवॅल्युएशनला (पुनर पडताळणी) दिला. सेंट झेविअर्स शाळेत शिकणाऱ्या मोहम्मद कैफ मुल्लाला पैकीच्या पैकी गुण मिळण्यासाठी एक गुण कमी पडत होता. त्याच्या या निकालानंतर सर्वांनी त्याच कौतूक केलं. पण मोहम्मद आपल्या निकालावर खुश नव्हता. त्याने पेपर रिव्हॅल्युएशनला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आलेल्या निकाल सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारा होता. मोहम्मदला या परिक्षेत ६२५ पैकी ६२५ मार्क्स मिळाले होते. या गुणांमुळे तो दहावी बोर्डातील टॉपर ठरला.

जास्त मार्कांची अपेक्षा 

'६२४ हे गुण माझ्यासाठी समाधानकारक नव्हते.  मला जास्त अपेक्षा होती' असे मोहम्मदने यावेळी सांगितले. या निकालासाठी त्याने आपले शिक्षक, नातेवाईक, शुभचिंतक सर्वांचे आभार मानले.  आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करा आणि स्वप्न प्रत्यक्षात जगा असे त्याने आपल्याहून लहान जणांना सांगितले आहे. मोहम्मदचे टॉपर बनण्याचे स्वप्न पूर्ण झालं. त्याचे आई बाबा हे सरकारी शाळेत शिक्षक आहेत. त्याचे बाबा हे उर्दूचे तर आई कन्नड विषयाची शिक्षिका आहे.