बारावी पास असणाऱ्यांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)  ज्यूनिअर ऑपरेटरच्या ५० वर रिक्त जागा आहेत. 

Updated: Jun 11, 2018, 03:43 PM IST
बारावी पास असणाऱ्यांना इंडियन ऑईलमध्ये नोकरीची संधी title=

मुंबई : १२ वी पास असणाऱ्यांसाठी इंडियन ऑईलमध्ये नोकर भरती सुरू आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल)  ज्यूनिअर ऑपरेटरच्या ५० वर रिक्त जागा आहेत. इच्छुक उमेदवार ७ जुलैपूर्वी अर्ज करू शकतात. उमेदवारासाठी अर्ज करण्यापूर्वी रिक्त पदांविषयीची माहिती समजून घ्या.

पदाचे नाव -  ज्यूनिअर ऑपरेटर

पोस्ट संख्या - एकूण ५० पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

पात्रता- कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेकडून १२ वी आणि आयटीआय कोर्स.

वयोमर्यादा-  किमान वय १८ वर्षे असणे आणि कमाल वय २६ वर्षे 
 
निवड प्रक्रिया - उमेदवारांची निवड लेखी परीक्षणावर आधारित

अंतिम तारीख - 7 जुलै 2018

पगार - १०,५०० ते २४,५००

अर्ज शुल्क- सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना शंभर रुपये तर एसटी / एससी उमेदवारांची फी नाही.

अर्ज कसा करावा - इच्छुक उमेदवार www.iocl.com या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.