७ दिवसात बागी २ ने केली इतकी कमाई!

बॉलिवूडमधील नव्या जनरेशनचा पावरपॅक अभिनेता टायगर श्रॉफची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

Updated: Apr 5, 2018, 05:57 PM IST
७ दिवसात बागी २ ने केली इतकी कमाई! title=

मुंबई : बॉलिवूडमधील नव्या जनरेशनचा पावरपॅक अभिनेता टायगर श्रॉफची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात टायगर श्रॉफचा बागी २ हा सिनेमा प्रदर्शित झाला. प्रदर्शित झाल्यानंतर ७ व्या दिवशी सिनेमाने १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी सिनेमाने २५ कोटींचा गल्ला केला होता. आणि या कमाईने चक्क दीपिकाच्या पद्मावत सिनेमाचा रेकॉर्डही तोडला. या जबरदस्त कमाईने २०१८ मधील सर्वात मोठी ओपनिंग बागी २ ने केली आहे.

ट्रेड एनालिस्ट तरण आदर्शने कमाईचे आकडे ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत.

 

करण जोहरने दिल्या शुभेच्छा

या जबरदस्त कमाईमुळे निर्माता दिग्दर्शक करण जोहरने टायगर श्रॉफला ट्विटरवर शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिशा-टायगरची केमिस्ट्री

टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांची केमिस्‍ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावते. या सिनेमातही टायगर-दिशाच्या जोडीचा रोमांटीक अंदाज त्याचबरोबर टायगरचा अॅक्शनपॅक पाहायला मिळणार आहे.