२५ नोव्हेंबरला रंगणार राणाची मॅटवरील कुस्ती

पाहायला विसरू नका 

२५ नोव्हेंबरला रंगणार राणाची मॅटवरील कुस्ती

मुंबई : झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. राणादा आणि पाठकबाई यांची निरागस,निखळ अशी प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. राणादा आणि पाठकबाई यांच्यावर सबंध महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. प्रेक्षकांचे प्रेम आणि पाठिंब्यामुळे या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. या मालिकेतील सर्व व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील घराघरात पोहोचल्या आहेत आणि त्या तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. 

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि राणा आणि अंजली मध्ये वाद चालले असून त्याचा परिणाम राणाच्या कुस्तीवर होत आहे. राणा एक मॅच हरतो. राणा आणि अंजली यांच्या भांडणाला कारणीभूत नंदिता आहे. पण राणासाठी मॅट वरील कुस्ती खूप महत्वाची असून त्याचा अंतिम सामना २५ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता २ तासाच्या विशेष भागात प्रसारित होणार आहे. सखीने राणाकडून तयारी करून घेत असली तर राणासाठी अंजलीची साथ आणि तिचा पाठिंबा देखील तितकाच महत्वाचा आहे.

अंजलीला राणाच्या कुस्तीच्या मध्ये यायचं नाहीये आणि म्हणूनच ती घर सोडून तिच्या माहेरी निघून गेली आहे. नेहमीच राणाची साथ देणारी अंजली त्याच्या महत्वाच्या सामन्याच्या वेळी त्याच्यासोबत असेल का?  राणा तिला मनवून परत घरी आणेल का? राणा ही मॅच जिंकेल का? हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेचा २ तासाचा विशेष भाग २५ नोव्हेंबर रविवार संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठी वर!!!