22 वर्षाची सुहाना खान अडकणार लग्नबंधनात; दुबईत पार पडणार अलिशान लग्नसोहळा?

सोशल मीडियावर सुहाना नेहमी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सुहानाचे जवळ-जवळ 3 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या स्टाईलिश अंदाजातले तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

सायली कौलगेकर | Updated: May 1, 2023, 12:22 AM IST
22 वर्षाची सुहाना खान अडकणार लग्नबंधनात; दुबईत पार पडणार अलिशान लग्नसोहळा? title=

मुंबई : बॉलिवूडमधील सुपरस्टार शाहरुख खानची लेक सुहाना खान ही प्रसिद्ध स्टारकिड आहे. बॉलिवूडच्या स्टार किड्समध्ये  सर्वात टॉपला शाहरुख खानची लेक आहे. सुहाना खानचे फोटो आणि व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. बॉलिवूडमध्ये पदार्पणापुर्वीच अभिनेत्री अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे.  लवकरच सुहाना  बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 

सोशल मीडियावर सुहाना नेहमी सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सुहानाचे जवळ-जवळ 3 मिलियनच्या वर फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच तिच्या स्टाईलिश अंदाजातले तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता पुन्हा एकदा सुहानाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  सुहाना खानला इंटरनेट सेंसेशनही  म्हटलं जातं. सुहाना खानचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 

तिचा हा लूक पाहून तिचे चाहते तिच्यावर घायाळ झाले आहेत. मात्र या सगळ्या दरम्यान सुहानाच्या चाहत्यांसाठी एक बातमी समोर येत आहे. आणि ही बातमी आहे सुहानाच्या लग्नाची. नुकताच सुहानाला सोशल मीडियावर लग्नाचा प्रस्तावही आला आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांचीही चांगलीच पसंती मिळते. आता सुहाना खानचे नवे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून या फोटोने चाहते घायाळ झाले आहेत. 

नुकताच सुहानाचा वाढदिवस होवून गेला. आणि या निमित्ताने तिची आई गौरी खानने तिच्यासाठी एक पोस्ट शेअर केली होती. गौरी खानने  खरंतर तिच्या लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिचा एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. मात्र या पोस्ट पेक्षा सुहानाच्या एका चाहत्याने केलेल्या कमेंटची सध्या जोरदार चर्चा सुरुये. खरंतर एका चाहत्याने शाहरुखच्या लेकीला थेट लग्नासाठी मागणी घातली आहे. सुहैब नावाच्या  ट्विटर युजरने लग्नाची मागणी घालत सुहानाच्या या पोस्टवर लग्न करशील का असं विचारलं आहे.

सुहैबने गौरी खानच्या पोस्टवर कमेंट करत लिहीलं आहे की, ''गौरी मॅडम, माझं सुहानासोबत लग्न करा. माझा पगार मासिक  एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.'' सुहैबच्या कमेंटनंतर सुहानाच्या लग्नाची अचानक सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली. एवढंच नव्हेतर सुहैबच्या कमेंटवर एकाने ईच्छा व्यक्त करत म्हटलं आहे की, त्याने सुहानासोबत दुबईत लग्न करावं.आता यावरून स्पष्टपणे असा अंदाज लावला जाऊ शकतो की सुहानाने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच लोकांच्या हृदयात स्वतःसाठी एक खास स्थान निर्माण केले आहे.