माझ्या वडीलांची काळजी घ्या, ३ दिवसाआधी सुशांतचे फोनवर संभाषण

वडील दूर राहत असल्याने सुशांतला नेहमी काळजी असायची.

Updated: Jun 15, 2020, 10:55 AM IST
माझ्या वडीलांची काळजी घ्या, ३ दिवसाआधी सुशांतचे फोनवर संभाषण title=

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण कलाविश्वात दु:ख व्यक्त केले जातंय. ही वार्ता सुशांतच्या वडीलांना कळाल्यानंतर त्यांची तब्बेत खालावली आहे. सर्वात जास्त दु:ख त्यांना आपला मुलगा गेल्याचे आहे. मुलाच्या मृत्युची बातमी ऐकून ते बेशुद्धच पडले होते. वडील दूर राहत असल्याने सुशांतला नेहमी काळजी असायची. ३ दिवसांआधी त्याने वडीलांना फोन करुन तब्बेतीची चौकशी केली होती. 

कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता तुम्ही घरातून बाहेर जाऊ नका असे त्याने आपल्या वडीलांना सांगितले होते. सुशांतचे वडील कृष्ण कुमार सिंह हे पटणामध्ये एकटे राहतात. लक्ष्मी या वडीलांच्या केअर टेकरसोबत तो बोलला होता. माझ्या वडीलांना कोरोनापासून वाचवा. त्यांना बाहेर पाठवू नका असे त्याने लक्ष्मी यांना सांगितले होते. यावेळी मी पटनाला येईन आणि वडीलांना फिरायला घेऊन जाईन असे त्याने सांगितले होते. 

रविवारी दुपारी जेवायला बसले असता सुशांतच्या वडीलांना फोन आला आणि ही बातमी कळाली. हे ऐकून ते बेशुद्ध पडले. शेजाऱ्यांनी मिळून त्यांना सावरले.

'सुशांतची आत्महत्याचं'

सुशांतने जेव्हा आत्महत्या केली, तेव्हा तो घरात एकटाच नव्हता, तर त्याचे काही मित्रही होते, अशी माहितीही समोर येत आहे. पोलिसांमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून काही कागदपत्र मिळाली आहेत, यामधून तो डिप्रेशनमधून जात होता, हे दिसत आहे. सुशांत सिंगने आत्महत्या केली आहे. संशयास्पद असं सध्या तरी काही हाती लागलेलं नाही, असं झोन ९ चे डीसीपी अभिषेक त्रिमुखे म्हणाले. 

पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या सोशल मीडियाचाही तपास केला जात आहे. सुशांत बऱ्याच कालावधीपासून सोशल मीडियापासून लांब आहे. सुशांतने शेवटचं ट्विट २७ डिसेंबर २०१९ ला केलं होतं. यानंतर तो ट्विटरवर ऍक्टिव्ह नव्हता. इन्स्टाग्रामवर त्याने शेवटची पोस्ट ३ जूनला केली होती. या पोस्टमध्ये त्याने आईचा फोटो शेयर केला होता.