मुंबई : ९३ व्या ऑस्कर अवॉर्डकरता (93rd Academy Awards) भारतातून मल्याळम सिनेमा 'जल्लीकट्टू'चं (Jallikattu) नॉमिनेशन झालं आहे. भारताकडून ऑस्करमध्ये जाण्यासाठी 'जल्लीकट्टू' या सिनेमासोबत अनेक सिनेमे रांगेत होते. पण 'जल्लीकुट्टू'ची वर्णी लागली.
Malayalam film 'Jallikattu' India's official entry at Oscars in International Feature Film category: Film Federation of India
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2020
'जल्लीकट्टू'च्या रांगेत हिंदी सिनेमा शकुंतला देवी, शिकारा, गुंजन सक्सेना, भोसले, गुलाबो सिताबो, सीरियस मॅन, बुलबु, कामयाब, द पिंक स्काय या सिनेमांचा समावेश होता. यासोबतच मराठी सिनेमा बिटर स्वीट आणि डिसाइपल यांचा समावेश होता.
ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून
मल्याळम चित्रपट 'जल्लीकट्टू'ची निवड.. फिचर फिल्म विभागात नामांकन मिळवण्यासाठी हा चित्रपट प्रयत्न करणार @zee24taasnews pic.twitter.com/rrygMRWGHW— @iamjayanti (@JayantiJourno) November 25, 2020
या अगोदर मदर इंडिया, सलाम बॉम्बे आणि लगान सिनेमांना विदेशी भाषेतील सिनेमांच्या कॅटगरीत नॉमिनेशन मिळवलं. पण या सिनेमांना ऑस्कर मिळाला नाही.
हा सिनेमा केरळ-तामिळनाडू राज्यात भरवल्या जाणाऱ्या वादग्रस्त स्पर्धा 'जल्लीकट्टू'वर आधारित आहे. हा सिनेमा एक थ्रीलर ड्रामा आहे. भारतातच नव्हे या सिनेमाने परदेशातही या कौतुकाची थाप मिळवली आहे. 63व्या बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमदध्ये 78 देशांतून निवडण्यात आलेल्या 229 सिनेमांपैकी 'जल्लीकट्टू' एक होता. यामध्ये अँटोनी व्हर्गिस (Antony Varghese),चेंबन विनोद जोस (Chemban Vinod Jose) आणि सबुमोन अब्दूसामद (Sabumon Abdusamad) यांचा दमदार अभिनय आहे.