मुंबई : ९८ वं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजपासून मुलुंडमध्ये सुरू होत आहे. मंबई उपनगरात २५ वर्षांनी हे संमेलन होत आहे. सलग तीन दिवस ६० तास विविध कार्यक्रमांचे आयोजन हे यंदाच्या नाट्य संमेलनाचे वैशिष्ट्य आहे.
आज सकाळी मराठी बाणा या कार्यक्रमाने याचा प्रारंभ झाला. दुपारी ४ वाजता नाट्य दिंडी निघणार आहे. तर संध्याकाळी साडेसहा वाजता उद्घाटन सोहळा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्घाटन सोहळ्याला खास उपस्थिती असणार आहे. मराठी बाणा या कार्यक्रमाला सकाळीच रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती...