कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत फोटो शेअर करत विकी कौशलने दिली महत्वाची माहिती

विकी कौशलसोबत एका अभिनेत्रीने फोटो शेअर केलाय. 

Updated: Jan 27, 2022, 08:43 PM IST
कतरिना नव्हे तर या अभिनेत्रीसोबत फोटो शेअर करत विकी कौशलने दिली महत्वाची माहिती title=

मुंबई : सध्या विकी कौशल सोबत एका अभिनेत्रीने आणि विकी कौशलने सोशल मीडियावर फोटो शेअर केलाय. या फोटोत अभिनेत्री विकीच्या खूपच क्लोज दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. विकी कौशलसोबत क्लोज पोज देणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारा अली खान आहे. साराने  विक्की सोबतचा हा सुंदर फोटो शेअर करून चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. विकी कौशल आणि सारा अली खान स्टारर लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं आहे.

लक्ष्मण उतेकर यांच्या या चित्रपटाचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. सारा अली खानने तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिचा आणि विकी कौशलचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत, सारा अली खानने चित्रपटाचं शूट संपल्याची माहिती देताना लिहीलंय की, सौम्याची भूमिका साकारायला दिल्याबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तरकर यांचे आभार मानले आहेत.

तिच्या पोस्टमध्ये साराने तिचा सहकलाकार विकी आणि चित्रपटाचे निर्माते पूजा विजान, दिनेश विजान आणि मासोक फिल्मचे आभार मानले आहेत. यासोबतच साराने चित्रपटातील संपूर्ण कलाकार आणि क्रूचे आभार मानले. विक्की कौशलनेही हाच फोटो त्याच्या सोशल मीडिया हँडलवर अपलोड केला आहे. त्याने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "नावात काय आहे, आता तर शूट पूर्ण झालं आहे". विकीने पोस्टमध्ये चित्रपटातील सर्व क्रू, कलाकार, दिग्दर्शक आणि निर्मात्यांचे आभार मानले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या खास दिवशी कलाकारांनी केक कापला आणि सेटवर घालवलेले क्षण अविस्मरणीय बनवले. तर साराने तिच्या पोस्टमध्ये विकी कौशलचे खूप कौतुक केलं आहे, तर अभिनेत्री म्हणाली, @vickykaushal09 सेटवर तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस धमाकेदार होता. पंजाबी गाण्यांचा आणि बोनफायरचा आनंद घेण्यापासून ते मॉर्निंग ड्राईव्ह आणि चहाचे गरम कप, माझ्यासाठी हा प्रवास इतका अविस्मरणीय बनवल्याबद्दल धन्यवाद. मला भेटलेल्या सर्वात छान, प्रतिभावान  अभिनेत्यांपैकी तू एक आहेस. आणि मी खूप भाग्यवान आहे की, मला तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची आणि तुझ्याकडून खूप काही शिकण्याची संधी मिळाली.