प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रमादरम्यान अपघात; चाहते चिंतेत

प्रसिद्ध गायकासोबक एक मोठी दुर्घटना घडली आहे. 

Updated: Sep 19, 2022, 06:35 PM IST
प्रसिद्ध गायकाचा कार्यक्रमादरम्यान अपघात; चाहते चिंतेत title=

मुंबई : अमेरिकेतील प्रसिद्ध रॅपर पोस्ट मेलोनसोबत एक मोठी दुर्घटना घडली आहे. ही घटना 27 वर्षीय पोस्टसोबत घडली आहे. जेव्हा तो अमेरिकेतील सेंट लुईसमध्ये लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना स्टेजवर  अचानक तोंडावर पडला. पोस्ट मेलोनसोबतच्या या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दुर्घटनेचा शिकार झाला पोस्ट मेलोन
खरंतर, अलीकडे पोस्ट मेलोन सेंट लुईसमधील एंटरप्राइझ सेंटरमध्ये एका संगीत मैफिलीत सादर करत होते. हा एक लाईव्ह शो होता. पोस्ट मेलोन आपल्या सर्कल गाण्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. तेवढ्यात स्टेजवर असलेल्या पोस्ट मालोनचा पाय रंगमंचावर असलेल्या गिटारच्या छिद्रात पडला, जो त्याच्या प्रवेशासाठी तयार करण्यात आला होता. यानंतर पोस्ट मालोन स्टेजवर तोंडावर पडला.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पोस्ट मेलोन स्टेजवर कसा जखमी झाला हे तुम्ही पाहू शकता. मॅलोन पडल्यानंतर लगेचच घटनास्थळावरील रक्षक स्टेजवर आले आणि अमेरिकन रॅपरला उचलू लागले. पोस्ट मेलोनला चेहऱ्यावर पडणं खूप वेदनादायक दिसत आहे. इतकंच नाही तर पोस्ट मेलोन देखील पडल्यानंतर वेदनांनी आक्रोश करताना दिसला. आपला आवडता गायक अशा घटनेचा बळी होताना पाहून एंटरप्राइज सेंटरमध्ये उपस्थित लोकांमध्ये शांतता पसरली. या अपघातानंतर पोस्ट मालोन यांना तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं.

स्टेजवर अचानक पडल्यानंतर काही वेळातच पोस्ट मेलोनने त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये पोस्ट मेलोन असं म्हणताना दिसत आहे की, 'सगळं ठीक आहे. डॉक्टरांनी मला पेन किलर दिली आहेत. मी तुम्हा सर्वांचा खूप आभारी आहे, तुमच्या पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यावेळेस माफी मागतो, मी नक्कीच सेंट लुईसमध्ये शो करण्यासाठी परत येईन.'