Jailer Film: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची (Rajinikanth) प्रसिद्धी कितपत आहे हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. कित्येक वर्षांपासून रजनीकांत आपल्या चाहत्यांच्या मनावर गारुड घालत आहेत. आपल्या प्रत्येक चित्रपटासह रजनीकांत यांची प्रसिद्धी आणखीनच वाढत आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांच्या चित्रपटांना अपेक्षित यश मिळू शकलेलं नाही. त्यातच आता त्यांचा 'जेलर' (Jailder) चित्रपट प्रदर्शित झाला असून, चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रजनीकांत यांचं स्टारडम आणि चाहत्यांचं त्याच्यावरील प्रेम पाहायला मिळत आहे.
रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असणारा 'जेलर' चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे साठी अनेक कंपन्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान, एका कंपनीने मात्र कर्मचाऱ्यांना चित्रपट पाहता यावा यासाठी तब्बल 2200 तिकीटं काढली आहेत.
Nasdaq मध्ये सूचीबद्ध असणाऱ्या फ्रेशवर्क्स या कंपनीने गुरुवारी प्रदर्शित होणाऱ्या 'जेलर'ची 2200 तिकिटे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बूक केली आहेत, अशी माहिती तिचे संस्थापक आणि सीईओ गिरीश माथरुबूथम यांनी दिली आहे. "2200 तिकिटे 7 स्क्रीन फक्त फ्रेशवर्क्सच्या कर्मचाऱ्यांसाठी," असं ट्वीट माथरुबूथम केलं आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये, फ्रेशवर्क्स यूएस स्टॉक एक्स्चेंजवर सार्वजनिक होणारी पहिली भारतीय SaaS (software as a servic) फर्म बनली होती. कॅलिफोर्निया-आधारित या कंपनीने कर्मचारी कपातीची घोषणा केली होती. ज्यामध्ये वरिष्ठ संचालक, उत्पादन व्यवस्थापक आणि GTM (गो-टू-मार्केट) सारख्या टीमच्या वरिष्ठ उपाध्यक्ष यांसारख्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना फटका बसला होता.
2200 tickets 7 screens Freshworks employees only #thalaivaralaparai #TigerkaHukum #ThalaivarNirandharam #freshworksda pic.twitter.com/shjOumBeaY
— Girish Mathrubootham (@mrgirish) August 9, 2023
2010 मध्ये गिरीश माथरुबूथम आणि शान कृष्णासामी यांनी फ्रेशडेस्क म्हणून स्थापन केलेल्या, कंपनीचे 2017 मध्ये फ्रेशवर्क्स म्हणून नामकरण करत नव्याने ब्रँडिंग करण्यात आले.
VIDEO | A Japanese couple has travelled from Osaka to Chennai, Tamil Nadu to watch Rajinikanth's new film 'Jailer'.
"To see the Jailer movie, we have come from Japan to Chennai," says Yasuda Hidetoshi, Rajinikanth fan club leader, Japan. pic.twitter.com/04ACrc4Q5c
— Press Trust of India (@PTI_News) August 10, 2023
'जेलर' या चित्रपटाचं दिग्दर्शन नेल्सल दिलीपकुमार यांनी केलं आहे. या चित्रपटात मोहनलाल आणि जॅकी श्रॉफदेखील आहेत. पण त्यांची नेमकी काय भूमिका आहे हे जाहीर करण्यात आलेलं नाही. याशिवाय रम्या कृष्णन, तमन्ना, विनायकर आणि योगी बाबूदेखील चित्रपटात आहेत. अनिरुद्ध रवीचंदरने चित्रपटाला संगीत दिलं आहे.
चित्रपटाचा टिझर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चित्रपटांबद्दल प्रचंड उत्सुकता होती. या चित्रपटातून रजनीकांत पुन्हा एकदा अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार असल्याने चाहत्यांना प्रचंड अपेक्षा आहेत.
दरम्यान, चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या चाहत्यांनी चित्रपटगृहातील फोटो शेअर केले आहेत. यामध्ये चित्रपटगृह प्रेक्षकांनी तुडुंब भरल्याचं दिसत आहे. उत्तर भारतातही चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.