हृता दुर्गुळेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; प्रथमेश परबला म्हणतेय, 'डिलिव्हरी पोहचली का?'

फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती काही वेळातच व्हायरल होते. नुकतीच हृताने एक स्टोरी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे जी अवघ्या काही वेळातच व्हायरल होवू लागते.

Updated: Dec 18, 2023, 07:55 PM IST
हृता दुर्गुळेने शेअर केलेली पोस्ट चर्चेत; प्रथमेश परबला म्हणतेय, 'डिलिव्हरी पोहचली का?' title=

मुंबई : 'फुलपाखरू' आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने एखादी पोस्ट शेअर करताच ती काही वेळातच व्हायरल होते. नुकतीच हृताने एक स्टोरी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे जी अवघ्या काही वेळातच व्हायरल होवू लागते.

सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड आहे ते म्हणजे डिलीव्हरी मिळाली काय? नुकताच अभिनेत्री हृता दुर्गेळेने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात तिने लिहीलं आहे की, #deleviry पोहचली का? तिने ही पोस्ट अभिनेता प्रथमेश परबला टॅग केली आहे. तिची ही पोस्ट अवघ्या काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या या पोस्टची सिनेसृष्टीत तसंच हृताच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. अनेकांना हा प्रश्न पडलाय की हॅशटॅग नेमका काय आहे. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार हा हॅशटॅग हृताच्या आगामी सिनेमाची घोषणा आहे.

लवकरच हृता दुर्गेुळेचा आणि प्रथमेशचा ‘डिलिव्हरी बॉय’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच सिनेमाची घोषणा करणारी ही पोस्ट असावी असं अनेकांचं म्हणणं आहे. याआधी हृता दुर्गेुळे आणि प्रथमेश परब 'टाईमपास 2' या सिनेमात दिसले होते. या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होत. त्यामुळे पुन्हा एकदा हृता आणि प्रथमेशला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत. 

 'डिलिव्हरी बॉय' हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप, अंकिता लांडे पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. लुसिया एंटरटेनमेंट प्रोडक्शन हाऊस निर्मित, सिनेपोलिस सिनेमा प्रस्तुत, मोहसीन खान दिग्दर्शित या चित्रपटाचे दीपा नायक प्रस्तुतकर्ता आहेत तर डेव्हिड नादर निर्माते आहेत. राम खाटमोडे आणि विनोद वणवे यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक मोहसीन खान म्हणतात, " 'डिलिव्हरी बॉय' हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. हसत हसत सामाजिक संदेश देणारा हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे नाव ‘डिलिव्हरी बॅाय’ का आहे, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.''