ए.आर.रेहमान घेऊन येतोय '99 सॉंग्स' म्यूझिक सिनेमा

 '99 सॉंग्स' असे या सिनेमाचे नाव असून खुद्द रेहमाननेच याची कहाणी लिहिली आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 23, 2017, 09:09 AM IST
ए.आर.रेहमान घेऊन येतोय '99 सॉंग्स' म्यूझिक सिनेमा  title=

मुंबई : ग्रॅमी आणि ऑस्कर विनिंग संगीतकार ए.आर.रेहमान लवकरच एक नवा सिनेमा घेऊन येतोय. '99 सॉंग्स' असे या सिनेमाचे नाव असून खुद्द रेहमाननेच याची कहाणी लिहिली आहे.

विश्वेश कृष्णमूर्ती यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात मनीषा कोयराल मुख्य भूमिकेत दिसत आहे. जानेवारी २०१८ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

फेसबुकवरून माहिती

 ए.आर.रेहमानने आपल्या फेसबुक अकाऊंटवरून यासंदर्भातील माहिती दिली. त्याने स्वत:च या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यामूळे या सिनेमातील सर्व गाणी खास असतील यात काही शंका नाही. 

 

फिल्मशी जोडल्या गेलेल्या कलाकारांबद्दल रेहमाननेच खुलासा केला आहे. मनिशा कोयराला, लीजा रे यांच्या व्यतिरीक्त इहान भट्ट, एडल्सी वर्गीज, तेनेजिन दल्हा, रंजीत बारोट आणि राहुल राम हे देखील मुख्य भूमिकेत आहेत.

१००० जणाच्या ऑडिशन्स नंतर रहमान यांनी सिनेमातील मुख्य जोडी इहान आणि एडल्सी यांना निवडले आहे. 
 
 हा एक रॉमेंटिक म्यूझिकल सिनेमा आहे. यामध्ये १० ते १२ गाणी प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.