close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या मैत्रीला नवी 'दिशा'

अभिनेत्री दिशा पटनीची एका युवा राजकीय नेत्याशी असलेली मैत्री सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Jun 12, 2019, 01:43 PM IST
आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्रीच्या मैत्रीला नवी 'दिशा'

मुंबई : अभिनेत्री दिशा पटनीची एका युवा राजकीय नेत्याशी असलेली मैत्री सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. इतकच नव्हे तर, तथाकथित प्रियकर टायगर श्रॉफ यालाही दिशाने दूर केल्याच्या चर्चाही चांगल्याच रंगत आहेत. युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत दिशा पटनी मुंबईतील एका हॉटेलमधून बाहेर पडतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. अभिनेत्री दिशा पटनी नेटकऱ्यांकडून चांगलीच ट्रोल होताना दिसत आहे. 'टायगर जिंदा है?', 'टायगर कहाँ है?' अशा प्रकारे तिला ट्रोल करण्यात येत आहे. बॉलिवूडमधील सर्वांत चर्चेत असलेली जोडी म्हणजे दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांची.  

अनेक लग्नसोहळ्यांना आणि पार्ट्यांना टायगर आणि दिशा जोडीने हजेरी लावतात. 'स्टुंडट ऑफ द इयर २' च्या स्क्रिनींगला दिशा उपस्थित होती, शिवाय तिने टायगरचे कौतुकही केले. तर 'भारत' चित्रपटाच्या स्क्रिनींगला जाऊन तिने टायगरचा उत्साह वाढवला. या दोघांमधील केमिस्ट्री बहरत असताना कहाणीमध्ये ट्विस्ट आला आहे. दिशाला टायगरचा विसर पडत चाललाय की काय, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत आहेत.

कारण आता टायगरला सोडून दिशा एका युवा राजकीय नेत्यासोबत डेटवर जात असल्याचे दिसून आले आहे. आदित्य आणि दिशा डिनर डेटवर गेल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांची ही दुसरी भेट असल्याचे समजत आहे. त्यावरून सोशल मीडियावर दिशाला ट्रोल केले जात आहे. दिशा आणि आदित्य ठाकरेंना पुन्हा एकमेकांसोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्यात आहेत.