आमिरला आवडला सैफचा कालाकांडी...

कालाकांडीचं स्पेशल स्क्रिनिंग बघितल्यावर आमिरने झाला खूष

Updated: Jan 11, 2018, 04:40 PM IST
आमिरला आवडला सैफचा कालाकांडी...

नवी दिल्ली : कालाकांडीचं स्पेशल स्क्रिनिंग बघितल्यावर आमिरने झाला खूष

लाडका अभिनेता

आमिर खान आपल्या उत्तम अभिनय आणि कामातील समर्पणासाठी ओळखला जातो. आपल्या एकापेक्षा एक बहारदार चित्रपटांमुळे रसिक प्रेक्षकांमध्ये तो प्रचंड लोकप्रिय आहे. अलिकडेच त्याच्या दंगल चित्रपटाने कमाईचे अनेक विक्रम मोडले. दंगलने प्रचंड यश मिळवलं.

कालाकांडीची स्तुती

अलिकडेच आमिरने सैफ अली खानचा आगामी चित्रपट कालाकांडीचा विशेष शो पाहिला. हा चित्रपट आमिरला प्रचंड आवडला. चित्रपट बघितल्यापासून आमिर त्याची प्रशंसा करत सुटलाय. त्यातल्या सैफच्या अभिनयावरही तो जाम खूष आहे. एरवी सोशल मीडीयावर जास्त कमीच असणाऱ्या आमिरने याबाबतीत ट्विट करून आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

वेगळा विषय

कालाकांडी चित्रपटाचं दिग्दर्शन अक्शत वर्मा यांनी केलंय. या चित्रपटात सैफ अली खानची प्रमुख भूमिका आहे. त्याबरोबरच अक्षय ओबेरॉय, कुणाल रॉय कपूर, दिपक डोब्रियाल, विजय राज, सोभीता धुलीपाला आणि इशा तलवार यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट एक थ्रिलींग कॉमेडी असून १२ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होतोय.