Aamir Khan Bank AD Controversy: बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा नेटकऱ्यांचा निशाण्यावर आला आहे. आमिर खानमागील ग्रह काही चांगले नाही असंच काहीस चित्र दिसतं आहे. अलीकडेच त्याच्या 'लाल सिंह चड्ढा'(Laal Singh Chaddha) या चित्रपटाला खूप विरोध झाला होता आणि आता तो एका जाहिरातीवरून (AD) आमिरला नेटकऱ्यांचा रोषाला समोरे जावं लागतं आहे. ज्याबद्दल इंटरनेटवर (Internet) बरीच चर्चा आहे. लोकांनी या जाहिरातीवर हिंदू परंपरांचा अपमान केल्याचा आरोप केला असून आता या वादात चित्रपट निर्माता विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनीही उडी घेतली आहे. आमिर खानवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत विवेकने त्याच्यावर निशाणा साधला आहे.
आमिर खान आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांनी अलीकडेच एका बँकेच्या जाहिरातीत एकत्र काम केलं आहे. जाहिरातीत तिने नवविवाहितेची भूमिका साकारली होती. या जाहिरातीची सुरुवात दोघे त्यांच्या लग्नातून कारमधून परतले आणि विदाई समारंभाच्या वेळी वधू का रडली नाही याबद्दल चर्चा करते. माणूसही 'घर जमाई' होऊ शकतो हे या जाहिरातीत दाखवण्यात आलंय. या जाहिरातमध्ये शतकानुशतके चालत आलेली प्रथा बदलण्याचं म्हटलं असून त्यामुळे विवेक अग्निहोत्री संतप्त झाले आहेत. (Aamir Khan Bank AD Controversy and vivek agnihotri nmp)
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांना ही जाहिरात आवडली नाही आणि त्यांनी तिची जोरदार टीका केली. काश्मीर फाइल्सचे डायरेक्टर विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, “सामाजिक आणि धार्मिक परंपरा बदलण्यासाठी बँका (bank) कशा जबाबदार आहेत हे मला समजत नाही. मला वाटते @aubankindia ने भ्रष्ट बँकिंग प्रणाली बदलून सक्रियपणे कार्य केले पाहिजे. ते असा मूर्खपणा करतात आणि मग म्हणतात की हिंदू ट्रोल (troll) करतात. मूर्ख'
I just fail to understand since when Banks have become responsible for changing social & religious traditions? I think @aubankindia should do activism by changing corrupt banking system.
Aisi bakwaas karte hain fir kehte hain Hindus are trolling. Idiots.pic.twitter.com/cJsNFgchiY— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) October 10, 2022
विवेक अग्निहोत्रीच्या या ट्विटनंतर लोकांनी आमिर खानला आणखी ट्रोल करायला सुरुवात केली आहे, लोक आता धर्माच्या नावावर आमिरला टोमणे मारत आहेत. याआधीही 'लाल सिंह चड्ढा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर (box office) अपयशी ठरल्याबद्दल विवेक अग्निहोत्रीने आमिरला फटकारलं होतं.