दिसतं तसं नसतं... गडगंज श्रीमंतीचा काय फायदा.... आमिरच्या लेकिवर गंभीर आजाराचं सावट

पाहा कोणत्या परिस्थितीतून जातेय आमिरची लेक

Updated: May 2, 2022, 02:26 PM IST
दिसतं तसं नसतं... गडगंज श्रीमंतीचा काय फायदा.... आमिरच्या लेकिवर गंभीर आजाराचं सावट title=
ira khan

मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्याचा सर्वांनाच हेवा वाटत असतो. किती ही श्रीमंती... अरेच्छा यांचं आयुष्य कसलं कमाल असेल ना... असं आपल्यापैकी कित्येकजण नकळत म्हणताना दिसतात. पण, पैसा, प्रसिद्धी आणि श्रीमंती असतानाही या सेलिब्रिटींच्या वाट्याला येणारं दु:ख जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केला आहे का? परफेक्शनिस्ट आमिर खान, सध्या याच वळणावरून जाताना दिसतोय. कारण, त्याची मुलगी आयरा डिप्रेनशनमागोमाग आणखी एका गंभीर आजाराशी झुंज देत आहे. (Ira Khan)

Anxiety शी ती सध्या दोन हात करताना दिसत असून, यासंबंधीचीच तिनं एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिनं मनातील भीतीही बोलून दाखवली.

एक मिरर सेल्फी काढत आयरानं लिहिलं, मला अँक्झायटी अटॅक येऊ लागले आहेत. फार भीती वाटते त्यावेळी... आतल्या आतच मला बेचैन असल्यासारखं वाटतं. मन प्रचंड विचलित होतं. मला याआधी कधीच असे अटॅक आले नव्हते, असं ती म्हणाली.

श्वास असंतुलित होणं, हृदयाचे ठोके वाढणं, रडू येणं.... अशा काही लक्षणांचा तिनं इथं उल्लेख केला. आपल्याला येणारे अटॅक याच कालावधीनं येत राहिले तर डॉक्टरांचीही मदत घ्यावी लागेल असं तिनं सांगितलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

झोप येते पण, झोपता येत नाही... मी स्वत:च्या मनातल्या भीतीला ओळखण्याचा प्रयत्न करत आहे, स्वत:शीच बोलत आहे, असं सांगत आयरानं तिच्या मनात असणारं दडपण शब्दांवाटे व्यक्त केलं.

मानसिक आरोग्यावर मोकळेपणानं बोलणारे तसे कमी, आयरानं इथं मोठ्या धाडसानं वक्तव्य केलं. ज्यानंतर अनेकांनीच तिच्या मानसिक आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली.