आमिरच्या मुलीचं प्रेमप्रकरण सोशल मिडियावर चर्चेत

आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम आणि सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Updated: Mar 27, 2019, 09:02 PM IST
आमिरच्या मुलीचं प्रेमप्रकरण सोशल मिडियावर चर्चेत

मुंबई : आमिर खानची मुलगी इरा ही नेहमीच प्रसारमाध्यमांपासून दूर असते. पण ती इन्स्टाग्राम आणि सोशल नेटवर्किंग साईटवर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम या तिच्या सोशल नेटवर्किंग साईटवर काही फोटो शेअर केले आहे. या फोटोमुळे तिच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira) on

अनेकांचे या फोटो आणि व्हिडिओवर कमेंट येत असून एका मुलांने असं लिहलं आहे की, 'मिशाल तू खूप भाग्यवान आहेस. इराला कधीही दुखवू नकोस'. 'तिच्या वडिलांसोबत मी तिला जेव्हा पहिल्यांदा लहानपणी पाहिले होते, तेव्हाच मी तिच्या प्रेमात पडलो होतो असे एकाने लिहिले आहे. अशाप्रकारच्या अनेक कमेंट आल्या आहे. आता हा मिशान कोण ? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल. 

 

आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ता यांच्या मुलीला म्हणजेच इरा खानला प्रेम झालं आहे. इरा सध्या शिकत आहे. इराच्या प्रेम प्रकराणाची चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू आहे. तिने शेअर केलेली इन्टाग्रावर फोटो बघुन सर्व थक्क झाले आहे. तिच्या बॉयफ्रेंड सोबतचे खुप सारे फोटो तिने शेअर केले आहेत. यातून त्यांतील जवळीकता सोशल मिडियावर दिसून येत आहे. त्या फोटोमध्ये तिने तिच्या बॉयफ्रेंडला किस करताना आणि मिठीत घेतानाचे फोटो शेअर केले आहेत. एवढंच नव्हे तर तिने तिच्या बॉयफ्रेडचे व्हिडिओ देखील शेअर केले आहे. इराला प्रेम झाल आहे असं दिसत आहे. आमिर खानची मुलगी कधी कॅमेरा सामोरी आली नाही तिचा कल फिल्म मेकिंगकडे आहे. इराने हे फोटो कॅलिफोर्नियातील सँता बार्बरा येथे काढलेले असून या फोटोत तिच्यासोबत असलेला मुलगा कोण आहे याची ही जाणुन घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. तिने या फोटोंत मिशाल किरपालानीला टॅग केले आहे. बॉलिवूडमध्ये स्टार्स किडच्या अफेअरची जितकी चर्चा होते. तितकी चर्चा त्याच्या ब्रेकअप देखील होते. इराचा बॉयफ्रेड मिशाल कृपलानी हा म्युझिशन आर्टिस्ट निर्माता कलाकार आणि उत्तम कलाकार आहे. इरा खान ही सोशल मिडियावर सतत ॲक्टिव्ह असते. स्ट्रार किडच्या हालचालीवर नेहमीच माध्यामामध्ये चर्चा असते आता इराचं आणि मिशाल नात पुढे काय वळण घेणार हे येणाऱ्या काळातच समजेलचं