Aamir Khan ला गर्दीतही आवरला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह, पाहा व्हिडीओ

गर्दी असूनही आमिर खानने पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. 

Updated: May 29, 2022, 09:53 AM IST
Aamir Khan ला गर्दीतही आवरला नाही पाणीपुरी खाण्याचा मोह, पाहा व्हिडीओ  title=

मुंबई : पाणीपुरी म्हटलं की कोणाच्या तोंडाला पाणी सुटत नाही असं नाही. पाणीपुरी म्हटलं की सगळं बाजूला ठेवून पहिल्यांदा तिथे धाव जाते. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खानलाही पाणीपुरी पाहताच हा मोह आवरला नाही. 

गर्दी असूनही आमिर खानने पाणीपुरी खाण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी खूप गर्दी केली होती. आमिर खानचा पाणीपुरी खातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की आमिर खान प्रचंड गर्दीत पाणीपुरी खाताना दिसत आहे. आमिरच्या हातात पाणीपुरीची प्लेट दिसत असून अभिनेता एकामागून एक पाणीपुरी खाताना दिसत आहे. आमिर खान ज्या पद्धतीने पाणीपुरी खात आहे, ते पाहून असे वाटते की त्यालाही पाणीपुरी खूप आवडते.

हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं आहे. चाहत्यांसाठी ही खूप मोठी पर्वणी आहे. आमिर खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.