अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?

Aamir Khan at Nepal for Vipassana Meditation Programme: आपल्या चित्रपटाच्या अपयशानंतर अभिनयातून ब्रेक घेतलेल्या आमिर खाननं (Aamir Khan News) नेपाळ गाठलं आहे. यावेळी तो तेथील एक विपश्यना केंद्रात पोहचला असल्याची माहिती समोर आली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: May 7, 2023, 11:16 PM IST
अभिनयातून ब्रेक घेतल्यानंतर आमिर खाननं गाठलं नेपाळचं विपश्यना केंद्र?  title=
फाईल फोटो

Aamir Khan at Nepal for Vipassana Meditation Programme: मागील वर्षी 'लाल सिंग चड्ढा' (Laal Singh Chadha) या चित्रपटाच्या अपयशानंतर आमिर खान आता अभिनयातून ब्रेक घेणार का? या चर्चांना कोण जोर आला होता. आमिर खानच्या या चित्रपटाचे बजेट मोठे होते त्याचसोबत हा चित्रपट 1994 साली आलेल्या 'फॉरेस्ट गम्प' (Aamir Khan Takes Break From Acting) या अजरामर चित्रपटाचा रिमेक होता. आमिर खानच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाविषयी रोष निर्माण होऊ लागला होता. जेव्हा चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि हळूहळू हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आला तेव्हा मात्र नेटकऱ्यांनी चित्रपट बॉयकॉट करा असा जाहीरनामा सुरू केला.

पाहता पाहता हा चित्रपट बॉयकॉट ट्रेण्डमध्ये (Box Office) तितका ओढला गेला की खुद्द आमिर खानलाही आपला चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा अशी विनवणी करावी लागली. परंतु चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकला नाही. 

चित्रपटाच्या अपयशानंतर एका खाजगी कार्यक्रमात आपण अभिनयापासून ब्रेक घेतला असल्याचे आमिरनं सांगितल्याची बातमी वेगानं फिरू लागली. त्यातून मध्यंतरी किरण रावसोबत एका पूजेच्या विधीसाठी एकत्र आलेला आमिर खान फारसा कॅमेऱ्यासमोर आलेला नाही. आता समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते आहे की आमिर खान चक्क नेपाळला (Aamir Khan in Nepal) पोहचला असून तिथल्या एका विपश्यना केंद्रात आहे. ध्यानधारणा करण्यासाठी तो तिथे पोहचल्याचे कळते आहे. 

हेही वाचा  - Jawan च्या दिग्दर्शकानं चाहत्यांना दाखवली बाळाची पहिली झलक; पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचं दर्शन

आमिर खान पोहचला नेपाळला, घेणार ध्यानसाधना? 

पीटीआयच्या वृत्तानुसार असं कळतंय की, आमिर खान 10 दिवसांसाठी विपश्यना क्रेंद्रात आला असून येथील मेडिटेशन प्रोग्राममध्ये सहभागी होणार आहे. आमिर (Vipassana Meditation Programme) रविवारी सकाळी काठमांडू येथे पोहचला असल्याचे एका इमिग्रेशन अधिकाऱ्यानं पीटीआयला सांगितले आहे. विस्तारा एअरलाईन्सतर्फे तो येथे आला आहे, असंही त्यानं पीटीआयला सांगितले. नक्की आमिर खान कोणत्या कारणासाठी येथे पोहचला आहे याबाबत अद्यापही पुष्टी नाही. त्याचसोबत तो एकटा गेला आहे की त्याच्यासोबत कोणी आहे याबद्दल काही पुष्टी नाही. 

एकामागोमाग एक फ्लॉप, आमिर खानला आता पर्याय काय? 

2018 साली आलेला 'ठग्स ऑफ हिंदूस्थान' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नव्हता. त्यानंतर 2022 साली आलेल्या 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटाला अपयशाचा फटका बसला होता. आपल्या या एकामागोमाग एक अपयशानंतर आमिर खाननं अभिनयातून ब्रेक घेतला असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आमिर खान 'चॅम्पियन' या चित्रपटाची निर्मितीही करतो आहे.