शाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो...

शाहरुख, सलमान आणि आमिरचे चित्रपट म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसांमध्येच १०० कोटींची कमाई, असं समीकरण झालं होतं.

Updated: Aug 22, 2017, 07:30 PM IST
शाहरुख-सलमानचे चित्रपट फ्लॉप, आमिर खान म्हणतो... title=

मुंबई : शाहरुख, सलमान आणि आमिरचे चित्रपट म्हणजे पहिल्या तीन-चार दिवसांमध्येच १०० कोटींची कमाई, असं समीकरण झालं होतं. पण यावेळी मात्र सलमान आणि शाहरुखचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. शाहरुखचा हॅरी मेट सेजल आणि सलमानच्या ट्यूबलाईटला बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करता आली नाही.

सलमान आणि शाहरुखच्या आपटलेल्या या चित्रपटांवर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चढ-उतार येत असतात. आम्ही सगळे पूर्ण मेहनत करतो आणि सगळ्यांना आवडतील असेच चित्रपट बनवतो पण, काही वेळा आम्ही यशस्वी होतो तर काही वेळा अयशस्वी होतो, असं आमिर म्हणाला आहे.

स्टार म्हणजे बॉलीवूडचे फक्त तीन खान हे म्हणणं चुकीचं आहे. बॉलीवूडमध्ये अनेक अभिनेते आहेत जे लोकप्रिय आहेत. अक्षय कुमारचा चित्रपट टॉयलेट एक प्रेमकथाला चांगलं यश मिळालं आहे, असं वक्तव्य आमिर खाननं केलं आहे.