Aamir Khan Disbalanced Fan Doubts He Is Drunk: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा सध्या ब्रेकवर आहे. त्यामुळेच तो शुटींग व्यतिरिक्त इतर गोष्टी एन्जॉय करत आहे. यामध्ये अगदी कॉनसर्टला उपस्थिती लावणे, कुटुंबाबरोबर वेळ घालवणे यासारख्या गोष्टींमध्ये आमीर व्यस्त आहे. सध्या आमिर अनेक पार्ट्यांनाही हजेरी लावत आहे. मात्र सध्या अशाच एका कथित पार्टीनंतरचा आमिर खानचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मध्यरात्रीनंतर काढलेल्या या व्हिडीओमधील आमिर खानच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तो मद्यधुंद अवस्थेत असल्याची शंका सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केली आहे.
एका ठिकाणावरुन बाहेर पडत असलेल्या आमिर खानसमोर अचानक पापाराझी म्हणजेच मनोरंजन सृष्टीसंदर्भात वार्तांकन करणारे फोटोग्राफर्स आले. या फोटोग्राफर्सला पाहून आपला तोल जाऊ नये म्हणून आमीरने दरवाजाची फ्रेम घट्ट धरुन ठेवली होती. विस्कटलेले केस, उगाच वेडावल्यासारखं हसणं हा असा आमिरचा अवतार पाहून फोटोग्राफरही गोंधळले. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. आमिरचा हा व्हिडीओ पाहून काहींनी कायम संयमीतपणे प्रसारमाध्यमांसमोर येणारा हा कलाकार अशाप्रकारे पाहणे हे फारच आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी आमिरवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
"तो त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण रावसारखा दिसतोय," असं एका युझरने म्हटलं आहे. तर अन्य एकाने, "तो मद्यधुंद अवस्थेत दिसतोय. मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं. कारण संपूर्ण देश या लोकांकडे शेजारच्या काकींप्रमाणे कायम लक्ष ठेऊन असतो," असं म्हटलं आहे.
"त्याला त्याचा वेळ त्याच्या इच्छेप्रमाणे एन्जॉय करण्याचा हक्क आहे. मला हे फारच रिफ्रेशिंग आणि क्युट वाटतंय," अशी प्रतिक्रिया अन्य एकाने दिली आहे. काहींनी यावरुन एवढा वाद निर्माण करण्याची काही गरज नसल्याचं म्हटलं आहे.
लाल सिंग चढ्ढा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटल्यानंतर आमिर खानने कामापासून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. "मी सध्या काहीच काम करत नाही. मागील काही वर्षांपासून मी सातत्याने काम करतोय. त्यामुळेच मला आता माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे. पाणी फाऊंडेशनचंही काम बाकी आहे. यासंदर्भातील काम सुरु आहे आणि अजूनही करायचं आहे. मी एका वर्षाने पुन्हा अभिनयाला सुरुवात करेल," असं आमिरने काही काळापूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलेलं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.