रात्री पोटभर जेवण झाल्यावर ताक पिताय? सावधान! होईल नुकसान

Taak Pinyache Tote: रात्री ताक पिण्यासाठी आपण खास आपला वेळ हा रोखून ठेवत असतो. रात्री मस्तपैंकी पोटभर जेवण झाल्यानंतर आपण ताक पिण्यासाठी फारच तरसत असतो. परंतु तुम्हाला माहितीये का की ताक पिण्याचेही बरेच तोटे आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 30, 2023, 05:38 PM IST
रात्री पोटभर जेवण झाल्यावर ताक पिताय? सावधान! होईल नुकसान title=
taakache tote what are the side effects of buttermilk trending health news

Side Effects of Buttermilk in Marathi: आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे हे फारच गरजेचे असते. त्यातून आपण आपल्या आहारातही अनेक लहान सहान चुका करत असतो. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे रात्री झोपण्याआधी आणि मस्त पोटभर जेवल्यानंतर आपल्याला ताक पिण्याची सवय असते. थंडगार, मसालेदार ताक पिण्यासाठी आपण वाट पाहत असतो. परंतु तुम्हाला माहितीये का की ताक पिण्याचे अनेक तोटेही असतात. ज्याचा आपल्या शरीरावर दुष्परिणाम होतात. चला तर मग जाणून घेऊया की नक्की रात्री ताक प्यायल्यानं तुमच्या शरीरावर कोणते परिणाम होऊ शकतात ते. अनेकदा आपल्याला वाटतं की ताक प्यायल्यानं आपल्या शरीराला त्याचा चांगला आरामही मिळेल परंतु त्याचा विपरीत परिणामही आपल्यावर होऊ शकतो. तेव्हा चला तर मग जाणून घेऊया की नक्की तुम्ही कोणती काळजी घेणे आवश्यक आहे.

  • काही तज्ञांच्या मते ताक हे आपल्या शरीराला थंडावा देते. त्यातून ताकात असे अनेक पोषकतत्त्वे आहे ज्यामुळे आपल्या शरीराला त्याचा चांगला फायदा होतो. परंतु रात्री जेवल्यानंतर ताकाचे सेवन करणं हे हानिकारकही होऊ शकते.  
  • आपल्याला ताक प्यायल्यानं फार चांगला फायदा होतो. म्हणजेच शरीरात पाण्याचीही कमतरता भासत नाही. त्यामुळे ताक प्यावेच. 
  • ताकात पॉटेशियम, व्हिटॅमिन B12, कॅल्शियम, आर्यन, फायबर, एन्टीऑक्सिडंट्स आणि एन्टीबॅक्टेरिअल अशी पोषक घटकं असतात. 
  • आपल्यापैंकी अनेकांना ताक पिण्याची आवड असते. काही जणं तर दुपारीही ताक पितात. त्यातून दिवसातून दोनदा तिनदा ताक पिण्याचीही काहींची सवय असते. परंतु अतिप्रमाणात ताक प्यायल्यानं तुमचे नुकसानही होऊ शकते. 
  • तुम्ही जर का रात्री ताक पित असाल तर तुम्हाला पोटाच्या समस्या होऊ शकतात. 
  • त्याचसोबत तु्म्हाला रात्री झोपायच्याही समस्या उद्भवू शकतात. 
  • ताक हे पचायला हलके असते परंतु ते फार थंडही असते. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून सर्दी-खोकलाही होऊ शकतो. 
  • ज्यांनी एग्जिमा आहे त्यांनी ताकाचे सेवन करू नये. 
  • ताक हे थोडे आंबट गोड असते त्यामुळे घशासंबंधीतही काही समस्या वाढू शकतात.
  • तुम्हाला काही फ्लू संबंधित समस्याही होऊ शकतात.

सध्या वातावरणही फार जास्त प्रमाणात बदलते आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या आरोग्याकडेही विशेष लक्ष देणे फारच गरजेचे असते. अशातच आता आपण काय खातो आणि काय पितो याकडेही बारीक लक्ष द्यायला हवे. त्यातून खाण्यापिण्याकडेही दुर्लेक्ष करून चालणार नाही. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)