मुंबई : आजकाल लठ्ठपणा हा आपल्याला १०० पैकी ८० % लोकांमध्ये पहायाला मिळतो. यात बऱ्याच सेलिब्रिटींचाही सामावेश आहे. लठ्ठपणा घालवण्यासाठी बऱ्याच सेलिब्रिटी व्यायाम करतात तर काही सेलिब्रिटी डाएट फॅालो करतात. या व्यतिरिक्त बऱ्याच सेलिब्रिटी वेग-वेगळ्या सर्जरीही करतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सेलिब्रिटीबद्दल सांगणार आहोत जिने लठ्ठपणा घालवण्यासाठी सर्जरी केली आणि स्वत:चा जीव गमावला. आम्ही बोलत आहोत प्रसिद्ध अभिनेत्री आरती अग्रवालबद्दल.
15 वर्षे तेलुगू चित्रपटसृष्टीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री सुपरस्टार चिरंजीवीने सोनाली बेंद्रेच्या अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 22 चित्रपट केलेल्या आरती अग्रवालचा चित्रपट प्रवास जरी उत्कृष्ट राहिला असला तरी, तिचं वैयक्तिक आयुष्य एखाद्या वेदनादायी कथेपेक्षा कमी नव्हतं.
या आजाराने ग्रस्त होती
जरी तिने तिच्या अभिनयातून नाव कमावलं असलं तरी ती तिच्या आयुष्यात कधी आनंदी नव्हती. मुख्यतः तिच्या आजारपणामुळे. आरतीला लठ्ठपणाचा त्रासदायक होता आणि त्यामुळे तिला अनेक समस्यांना सामोरंही जावं लागलं होतं. तिच्या वाढत्या लठ्ठपणामुळे तिला चित्रपटात काम मिळणं बंद झालं होतं.
लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी लिपोसक्शन सर्जरी करण्यात आली
आरती आपल्या लठ्ठपणामुळे इतकी नाराज झाली होती की, ती वजन कमी करण्यासाठी तिने शस्त्रक्रियेचा सहारा घेतला. लठ्ठपणा दूर करण्यासाठी अभिनेत्रीने 'लायपोसक्शन सर्जरी' केली. ही सर्जरी करण्यासाठी ती हैदराबादमधील डॉक्टरांना भेटली तेव्हा डॉक्टरांनी तिला ही शस्त्रक्रिया न करण्याचा सल्ला दिला. पण ती तिच्या आजाराला कंटाळली होती आणि त्यातून मुक्त होण्यासाठी काहीही करायला तयार होती.
आरतीने लिपोसक्शन शस्त्रक्रिया करून शरीरातील अतिरिक्त चरबी काढून टाकली होती, पण तिला इतर अनेक समस्या जाणवू लागल्या. ऑपरेशननंतर आरतीला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याचंही तिने सांगितलं. उपचारासाठी तिला न्यू जर्सी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तेथे उपचार सुरू होण्यापूर्वीच आरतीचा मृत्यू झाला.
अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर, ती लठ्ठपणा आणि फुफ्फुसाच्या आजाराशी झुंज देत होती आणि उपचारादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झाल्याचं उघड झालं. आरतीने वयाच्या ३१ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. त्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारच्या सर्जरी करणार असाला तर सावधान. अशा सर्जरी करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या किंवा जर तुम्हाला वजन कमी करायचं असल्यास व्यायाम करा. योग्य ते डाएट घ्या.