Bigg Boss 18 : सलमान खानसोबत अब्दू रोजिक बिग बॉस 18 होस्ट करणार?

बिग बॉस 16 मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतलेला अब्दू रोजिक सलमान खानसोबत बिग बॉस 18 होस्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 10, 2024, 03:43 PM IST
Bigg Boss 18 : सलमान खानसोबत अब्दू रोजिक बिग बॉस 18 होस्ट करणार?   title=

Bigg Boss 18 : 'बिग बॉस ओटीटी 3' संपला असून आता निर्मात्यांनी अभिनेता सलमान खानसोबत 'बिग बॉस 18' ची तयारी सुरु केली आहे. सध्या सोशल मीडियावर 'बिग बॉस 18' संदर्भात अनेक बातम्या व्हायरल होत आहेत. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 'बिग बॉस 18' ला सुरुवात होणार आहे. 

दरम्यान, यावेळी अभिनेता सलमान खानसोबत अब्दु रोजिक देखील 'बिग बॉस 18' होस्ट करताना दिसणार आहे. 'बिग बॉस 16' मध्ये अब्दू रोजिकने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. ज्यामध्ये त्यांने सर्वांची मने जिंकली होती. त्यावेळी सलमान खान देखील अब्दूच्या प्रेमात पडला होता. 

अब्दू रोजिक 'बिग बॉस 18'  होस्ट करणार? 

मीडिया रिपोर्टनुसार, अब्दू रोजिक 'बिग बॉस 18' चे काही खास भाग सलमान खानसोबत होस्ट करताना दिसणार आहे. अब्दूने स्वत: याला दुजोरा दिला असून तो या नव्या भूमिकेबद्दल खूप उत्सुक आहे. त्याने म्हटलं आहे की, 'बिग बॉस 16' मधला माझा काळ खूपच सुंदर होता. त्यामुळे आता मी माझ्या भाषेवर आणि स्वर कौशल्यावर खूप मेहनत घेत आहे. जेणेकरून 'बिग बॉस 18' होस्टसाठी मी माझे सर्वोत्तम देऊ शकेन. 

अब्दू रोजिकवर नवीन भूमिका आणि जबाबदाऱ्या 

पुढे अब्दू रोजिक म्हणाला की, आता पुन्हा एकदा मला बिग बॉसचा भाग बनून घरी परतल्यासारखे वाटत आहे. पण यावेळी मला नवीन भूमिका आणि नव्या जबाबदाऱ्या मिळाल्या आहेत. हा सीझन अप्रतिम असणार आहे. त्यामुळे मी यावेळी प्रेक्षकांसाठी काहीतरी खान घेऊन येणार आहे. जे त्यांना खूप आवडेल. असं अब्दू रोजिक म्हणाला.