बंगाली आणि बॉलिवूडमधील 70-80 च्या दशकातील अभिनेत्री मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee) हिने मनोरंजनसृष्टीत गाजवली. 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण. त्यानंतर 17 व्या वर्षी लग्न आणि 18 वर्षी एक मुलाची आई. पण तिचा अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली. आज ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. पण तिचा 1967 मध्ये बंगाली चित्रपट बालिका वधूमधील वधूची भूमिकने खूप दाद मिळवली होती. मौसमी चॅटर्जीने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मौसमीचं कधीही कोणत्याही स्टारसोबत अफेअर नव्हतं पण जेव्हा तिचं करिअर शिखरावर होती. तेव्हा तिचं नाव संजीव कुमार, विनोद मेहरा, फारूख शेख आणि जितेंद्र यांच्याशी जोडलं गेलं, जरी तसं काही नव्हतं. पण अभिनयासोबतच ती तिच्या आक्रमक स्वभावासाठीही ओळखली जाते. (Dimple Kapadia daughter is yours or Rishi Kapoor Why did moushumi chatterjee ask Rajesh Khanna)
एका मुलाखतीत मौसमीने राजेश खन्नासोबतबद्दल अनेक गोष्टी सांगितल्यात. त्या मुलाखतीत मौसमी म्हणाली की, 'राजेश खन्ना यांनी अनेक चुकीच्या गोष्टी केल्या आहेत पण ते आज तिथे नाहीत. जेव्हा ते शेवटच्या टप्प्यात होते, तेव्हा मी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा ते माझ्या लहान मुलीसमोर माझे खूप कौतुक करत होते. ते म्हणाले होती की तुझी आई वेडी आहे पण आम्ही सर्व तिला घाबरायचो, त्यांचा कोणत्याही प्रकारच्या मूर्खपणावर विश्वास नव्हता.'
या मुलाखतीत मौसमी यांनी अजून एक विचित्र किस्सा सांगितला. राजेश खन्ना यांनी मौसमी गर्भवती असताना वाईट कमेंट केली होती. राजेश खन्ना यांनी मौसमी यांना विचारलं की, तुझ्या पोटातील मुलाचे वडील विनोद मेहरा आहे की पती जयंत मुखर्जी? राजेश खन्ना यांच्या या प्रश्नाने मौसमी यांना अतिशय राग आला. त्यांनी या प्रश्नांला सडेतोड उत्तर देत विचारलं की, डिंपल कपाडियाच्या मुली तुमच्या आहे की ऋषी कपूरच्या..?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मौसमी दहावीत होती तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी तिचं लग्न निश्चित केलं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी मौसमी यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर तिने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली त्याच वयात ती पहिल्यांदा आई झाली.