Rishi Kapoor असं ठेवायचे Ranbirवर लक्ष, Abhishek Bachchan कडून खुलासा

ऋषी कपूर यांचा खास किस्सा 

Updated: Apr 12, 2021, 10:45 AM IST
Rishi Kapoor असं ठेवायचे Ranbirवर लक्ष, Abhishek Bachchan कडून खुलासा

मुंबई : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) चा नुकात 'द बिग बुल' (The Big Bull) सिनेमा प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला प्रेक्षकांची मिश्र प्रतिक्रिया आहे. मात्र सिनेमातील अभिषेकच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. या सिनेमासंदर्भातील एका मुलाखतीत अभिषेकने ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर आपला मुलगा अभिनेता रणबीर कपूरवर कसं लक्ष ठेवयाचे याचा खुलासा केला आहे. 

अभिषेकने एका मुलाखतीत ऋषी कपूर आणि रणबीर कपूर यांचा एक किस्सा सांगितला आहे. यावरून लक्षात येतं की, ऋषी कपूर एक वडिल म्हणून कसे होते. ऋषी कपूर आणि मी शिमलामध्ये एका सिनेमाचं शुटिंग करत होते. सकाळी उठल्यावर मी ऋषी कपूर यांच्या रूममध्ये गेलो. कारण आम्ही सकाळची कॉफी एकत्र घेत असू. तेव्हा ऋषी कपूर लुंगी घालून चष्मा लावून कॉम्प्युटरमध्ये काही ना काही पाहत होते. 

यापुढे अभिषेक बच्चनने सांगितलं की, तेव्हा त्यांना मी विचारलं की, तुम्हा हे काय करत आहात? तेव्हा ऋषी कपूर यांनी एका गॉसिप वेबसाइट संदर्भात सांगितलं. ज्या वेबसाइट बद्दल मी पहिल्यांदाच ऐकलं नव्हतं. तेव्हा ऋषी कपूर यांनी सांगितलं की, यांच्या मार्फत ते रणबीर कपूरच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे हे जाणून घेतात. त्यावेळी मला वाटलं की, हा माणूस कमाल आहे. हे मला खूप मनापासून वाटतं.