सोशल मीडियावर अभिषेक बच्चनला डिसचार्ज मिळाल्याची चर्चा

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घतलं आहे.  

Updated: Jul 13, 2020, 12:56 PM IST
सोशल मीडियावर अभिषेक बच्चनला डिसचार्ज मिळाल्याची चर्चा

मुंबई : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घतलं आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची कळताच संपूर्ण देश बच्चन कुटुंबीयांसाठी प्रार्थना करत आहेत. 
बिग बी सध्या मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. बिग बींना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच त्यांचे चाहते अत्यंत व्यकूळ झाले. बिग बींनंतर थोड्याच वेळात अभिनेता अभिषेक बच्चनला देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. 

अभिषेकवर देखील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान सोशल मीडियावर त्याला रुग्णालातून डिसचार्ज मिळाल्याच्या चर्चा रंगत आहेत. यावर अफवांवर खुद्द अभिषेकने ट्विटरच्या माध्यमातून  पूर्णविराम दिला आहे. 

मी अद्याप रुग्णालयात असल्याची माहिती अभिषेकने दिली आहे. रविवारी दुपारीपासून सोशल मीडियावर अभिषेकला डिसचार्ज मिळाल्याची बाबसमोर आली. अभिषेक बच्चनच्या पठोपाठ ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चनला देखील कोरोना झाल्याची माहिती अभिषेकने ट्विटरद्वारे दिली. 

शनिवारी संध्याकाळी अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांना कोरोना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आला. त्यानंतर कुटुंबातील आणि घरातील इतर व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चनला देखील कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. अभिनेत्री जया बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.

अमिताभ यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं ट्विटवरून सांगितलं. त्यानंतर अभिषेकने देखील शनिवारी सकाळी माझे आणि वडिलांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आम्हा दोघांना कोरोनाची सौम्य लक्षण असल्याचं  ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.