अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री

आता ऐश्वर्या नाही, तर या प्रसिद्ध अभिनेत्रीवर जडला आहे अभिषेकचा जीव, ती अभिनेत्री देखील म्हणाली...  

Updated: Mar 24, 2022, 12:04 PM IST
अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री title=

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन स्टारर 'दसवी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र आभिषेकच्या नव्या सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे. सिनेमात अभिषेक शिवाय यामी गौतम आणि निम्रत कौर मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलर सर्वांना प्रचंड आवडत आहेत. सिनेमा अभिषेक बच्चनच्या शिक्षणा भोवती फिरताना दिसत आहे. 

सिनेमात अभिषेक आठवी शिकलेला दाखवण्यात आला आहे, ज्यावेळी तो दाहवीच्या परीक्षेसाठी तयारी करतो.. तेव्हाची परिस्थिती आणि अभ्यास करण्यासाठी त्याची मेहनत दिसून येत आहे. 

ट्रेलरमध्ये एक सीन दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये शिक्षक अभिषेकला विचारतो, 'Ranveer loves Deepika...' चं पॅसिव्ह व्हाईस करून दाखव, यावर अभिषेक म्हणतो, 'Everybody loves Deepika.'

अभिषेकच्या उत्तरावर अभिनेत्री दीपिका पादुकोणने देखील उत्तर दिलं आहे. ती म्हणाली, 'टीम दसवीने मला जे प्रेम दिलं आहे, त्याबद्दल आभार... तुम्हाला आणि सिनेमाला शुभेच्छा....' असं म्हणतं दीपिकाने भावना व्यक्त केल्या आहेत. 

सिनेमात अभिषेक हरियाणाचा मुख्यमंत्री गंगा राम चौधरीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर निम्रत कौर अभिषेकच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेत्री यामी गौतम देखील सिनेमात पोलीस अधिकारी ज्योती देसवालची भूमिका साकराताना दिसणार आहे. 'दसवी' सिनेमा नेटफ्लिक्सवर 7 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.