मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील  बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.

Updated: Jun 22, 2017, 08:36 PM IST
मुंबई महापालिकेची अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे अडचणीत आला आहे. अर्शदच्या मुंबईतील  बंगल्याचा काही भाग मुंबई महापालिकेने पाडला आहे.
बेकायदेशीरपणे मजला बांधल्यामुळे मुंबई महापालिकेने सोमवारी अर्शद वारसीच्या बंगल्यावर कारवाई केली आणि बंगल्यावर  विनापरवाना बांधलेला मजला तोडला. या अनधिकृत बांधकामाबद्दल महापालिकेला चार वर्षांपूर्वीच माहिती मिळाली होती.
 
एअर इंडियातील  कर्मचाऱ्याकडून अर्शद वारसीने 2012 मध्ये बंगला खरेदी केला होता. बंगल्यात नूतनीकरण करत असताना अनधिकृत बांधकाम केल्याची माहिती होती. 
 
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बेकायदेशीर भागाचा काही भाग काढून टाकला.  अभिनेता त्यांच्या बंगल्यामध्ये उपस्थित नव्हता आणि उरलेला काही भाग लवकरच पाडला जाईल.