लहान असो किंवा मोठे, श्रीमंत असो किंवा गरीब आषाढी वारी एकदा तरी करावी असं प्रत्येकालाच वाटतं असतं. गळ्यात तुळशीची माळ आणि हातात कोणतंही शस्त्र नसलेला हा पंढरीचा माय बाप कमरेवर हात ठेऊन युगे अठ्ठावीस विटेवर उभा राहतो. सांगायचं कारण म्हणजे आषाढी वारीचं हे वेड आता मराठी कलारांमध्ये देखील पाहायला मिळत आहे.नुकतंच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या घरातील विठ्ठालाचा मुर्तीचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेता अक्षय केळकर सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच चाहत्यांच्या संपर्कात असतो. अक्षयने इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं. अक्षयने त्याच्या घरातील विठ्ठलाच्या मूर्तीचा फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून तुकोबांच्या अभंगातील 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' या अभंगाची आठवण होते. कपाळावर चंदनाचा टीळा, गळ्यात दागिने आणि पांढऱ्या रंगाचं पितांबर नेसलेली विठ्ठलाची मूर्ती सुबक मूर्तीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला.
अक्षयने खिडकीच्या काचेवर दिसणाऱ्या मुर्तीचं लोभस प्रतिबिंब कॅमेऱ्यात कैद केलं. त्याने त्याच्या घरातील हा फोटो पोस्ट करत त्याच्या भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. अक्षय म्हणतो की, ही माझ्या घरची खिडकी... इथून उन दिसत, वारा दिसतो, पाऊस दिसतो... इथून आकाश दिसत... आकाशात असंख्य स्वप्नं ही दिसतात...आणि पाठीशी तू आहेस की.. राम कृष्ण हरी असं कॅप्शन त्याने दिलं. अक्षय केळकर बद्दल सांगायचं झालंच तर, नील मृगसी, दोन कटींग या शॉर्टफिल्ममध्ये अक्षयने त्याच्या अभिनयाची छाप सोडली. सध्या तो अबीर गुलाल या मालिकेत अगस्त्य नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे.