'संस्कारी बाबूजी' Alok Nath आऊट ऑफ कंट्रोल? चक्क दारूच्या नशेत केलं 'ते' कृत्य

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलोक नाथ यांच्यासोबत काम केलेल्या अनेक कलाकारांनी हा दावा केला होता की दारू पिल्यानंतर आलोक नाथ हे त्यांच्यावरचा ताबा घालवतात. 

Updated: Feb 5, 2023, 12:53 PM IST
'संस्कारी बाबूजी' Alok Nath आऊट ऑफ कंट्रोल? चक्क दारूच्या नशेत केलं 'ते' कृत्य title=

Actor Alok Nath : अभिनेता आलोक नाथ (Alok Nath) यांना आपण छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर नावाजलेल्या भूमिका करताना पाहिलं. त्या भूमिकांमुळे त्यांची 'संस्कारी बाबूजी' ची भूमिका तर प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आलोक नाथ यांनी 'हम साथ साथ हैं', 'हम आपके है कौन', 'परदेस', 'मैने प्यार किया' आणि 'विवाह' सारख्या चित्रपटांमध्ये बाबूजींची भूमिका साकारली होती. त्याचसोबत छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये सासरे आणि वडिलांसारख्या भूमिका साकारल्या. मात्र, तुम्हाला माहिती का 90 च्या दशकात छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारा'च्या लेखिका-निर्मात्या विनिता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर मोठा आरोप केला आहे.

#MeToo कॅम्पेन अंतर्गत आलोक नाथ यांचे नाव न घेता विनिताने इशारा देत हे आरोप केले होते. 'तारा' या मालिकेत काम केलेल्या एका मुख्य अभिनेत्याने तिच्यावर बलात्कार केला असे विनीतानं सांगितले. विनीता पुढे म्हणाली की, "आज तीच व्यक्ती बॉलिवूडमध्ये मोठी स्टार बनली आहे आणि लोक त्याला 'संस्कारी' नावाने ओळखतात." विनीताचा इशारा फक्त आलोक नाथ यांच्याकडे होता. दरम्यान, याआधी देखील आलोक नाथ यांचे नाव वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. आलोक नाथ यांच्या मद्यपान केल्यानंतर ते कसं करतात याचे किस्से देखाील व्हायरल झाले होते. 

हेही वाचा : 'कसौटी जिंदगी की' फेम Actress चा गंभीर कार अपघात

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलोक नाथ यांच्यासोबत काम केलेले अनेक स्टार्स असा दावा करत आहेत की मद्यपान केल्यानंतर आलोक नाथ हे बेकाबू होतात. त्यांच्या संबंधीत असाच एक किस्सा समोर आला होता. 'तारा' या मालिकेची स्टार कास्ट एकदा शोच्या निमित्तानं दुबईला गेली होती. दुबईहून परतत असताना, फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी आलोक नाथ यांनी भरपूर मद्य केले होते. आलोक नाथ ज्या फ्लाइटमध्ये बसले होते, त्या फ्लाइटला काही तांत्रिक कारणांमुळे उशीर झाला. दरम्यान, फ्लाइटचा पायलट येताच मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आलोक नाथ यांनी त्यांना जोरदार कानशिलात लगावली. यानंतर आलोक नाथसह टीव्ही सीरियल तारामधील अनेक स्टार्सना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचे सांगण्यात आलो होते.