ठाणे भिवंडी मेट्रो मार्गातील सर्वात कठिण आणि अत्यंत महत्वाचा टप्पा पार; अभियांत्रिकी कौशल्याचा कस

मेट्रो 5 म्हणजेच ठाणे - भिवंडी -कल्याण हा एक महत्त्वाचा मार्ग ठरणार आहे. यामुळे लोकलच्या रखडमपट्टीला वैतागलेल्या आणि वेळखावू रस्ते वाहतुकीने पिचलेल्या एका मोठ्या भागाला थेट मेट्रोचा पर्याय उपलब्ध होणार आहे.  

वनिता कांबळे | Updated: Sep 28, 2024, 07:55 PM IST
ठाणे भिवंडी मेट्रो मार्गातील सर्वात कठिण आणि अत्यंत महत्वाचा टप्पा पार; अभियांत्रिकी कौशल्याचा कस   title=

Mumbai Metro Line 5 Thane Bhiwandi :  मेट्रो लाइन - 5 अंतगर्त उभारण्यात येणाऱ्या  ठाणे भिवंडी कल्याण प्रकल्पाचे काम प्रतिपथावर आहे. ठाणे भिवंडी मेट्रो मार्गातील सर्वात कठिण आणि अत्यंत महत्वाचा टप्पा पार पडला आहे. घोडबंदर रोडवर तसेच ठाणे-भिवंडी रस्त्यावर स्पॅन उभारण्यात आले आहे. रात्रीच्या वेळेस हे जम्बो ऑपरेशन करण्यात आले.  

उच्च क्षमतेच्या क्रेनच्या दोन विशेष स्पॅनच्या यशस्वी उभारण्यात आले आहेत.  अभियांत्रिकी कौशल्याचा कस लागला होता. हे काम अतिशय आव्हानात्मक होते.  नेहमी व्यस्त रस्त्याच्या मधोमधच नाही तर माजोवाडा फ्लायओव्हरच्या अगदी वर दाट लोकवस्तीच्या निवासी भागात हे गर्डर उभारण्याचे काम करण्यात आले. रात्रीच्या वेळी केवळ 5 तासांत ते ऑपरेशन राबवण्यात आले. 

हे देखील वाचा...ठाणे ते बोरिवली प्रवास फक्त 12 मिनीटांत; नॅशनल पार्कच्या जंगलातून जाणारा भारतातील सर्वात मोठा भुयारी मार्ग

पिअर 10-11 दरम्यानच्या 57.50 मीटर अंतरासाठी, घोडबंदर रोडवर 290 मेट्रिक टन वजनाच्या गर्डर्सचे टँडम लिफ्टिंग करण्यात आले. त्याचप्रमाणे, ठाणे-भिवंडी रस्त्यावरील 46.00 मीटरचा स्पॅन 20 मीटर क्रेन त्रिज्यामुळे सुपर-लिफ्ट व्यवस्था वापरून पूर्ण करण्यात आला. यापूर्वी मेट्रो मार्ग 5 च्या मार्गिकेत येणाऱ्या कशेळी येथील 550 मीटर लांबीच्या खाडीवर मेट्रो चा पुल उभरण्याकरिता सेगमेंटल बॉक्स गर्डर या पद्धतीचा वापर करून एकुण 13 स्पॅन उभारण्यात आले. यानंतरचा हा मोठा टप्पा आहे. 

 

ठाणे  भिवंडी कल्याण असा हा मेट्रो लाइन 5 चा मार्ग 24.90 किलोमीटर लंबा एलिवेटेड कॉरिडोर आहे. यात 17 स्टेशन असणार आहेत. मेट्रो 5 ची संलग्नता मुंबई मेट्रोशी आहे.  मेट्रो मार्गिका 5 चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी प्रदान करणार आहे.  ज्यामुळे नागरिकांना वाहतुकीची एक नवीन आणि पर्यावरण पूरक पर्याय मिळणार आहे. 8 हजार 416 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.  कापुरबावडी, बाळकुम नाका, अंजुरफाटा, धामणकर नाका,  भिवंडी, रंजोली गाव, दुर्गाडी, कल्याण स्टेशन या मार्गावरचे भाग मेट्रोने जोडले जाणार आहेत.