मनोरंजन विश्वात आणखी एक धक्का! कोरोनामुळे प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन

आर्मी ऑफिसर म्हणून निवृत्त झाल्यावर अभिनय क्षेत्रात केलं पदार्पण 

Updated: May 1, 2021, 12:03 PM IST
मनोरंजन विश्वात आणखी एक धक्का! कोरोनामुळे प्रसिद्ध अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं निधन

मुंबई  : टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेता बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोराना संक्रमणाने निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या साली या कलाकाराने घेतला अखेरचा श्वास. बिक्रमजीत कंवरपाल अभिनेता होण्याअगोदर एक आर्मी ऑफिसर होते. (Actor Bikramjeet Kanwarpal dies of Covid-19 complications) 2003 साली आर्मीमधून रिटायर झाल्यानंतर बिक्रमजीत कंवरपाल यांनी अभिनय क्षेत्रात डेब्यू केली आहे. बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची माहिती अभिनेता अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर केली आहे.  

कलाकारांनी व्यक्त केला शोक 

अशोक पंडित यांनी ट्विट केलं,'आज सकाळी कोरोनामुळे मेजर बिक्रमजीत कंवरपाल यांच्या निधनाची दुःखद बातमी कळली. एक सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर, कंवरपालने अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये सहकालाकार म्हणून काम केलं. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.'

अशोक पंडित यांच्यासोबतच मनोज बाजपेयी, श्रिया पिळगांवकर, रोहित रॉय, नील नितिन मुकेश, कुबरा सैत यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मनोज वाजपेयी लिहितात,'हे देवा, किती दुःखद बातमी. आम्ही एकमेकांना 14 वर्षांपासून ओळखतोय. 1971 मध्ये सिनेमाच्या शुटिंग दरम्यान एकमेकांची ओळख झाली. खूपच हैराण करणारी घटना'

अनेक कलाकारांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं जात आहे.