सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची मोठी झेप; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

. सिद्धार्थच्या जाण्यानं तुटलेली शहनाज...

Updated: Oct 20, 2021, 06:47 AM IST
सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची मोठी झेप; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
शहनाज गिल

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर त्याची खास मैत्रीण आणि कथित प्रेयसी शहनाज गिल हिच्यावर दु:खाचा डोंगरच कोसळला होता. सिद्धार्थच्या जाण्यानं तुटलेली शहनाज आता कुठे तिच्या आयुष्याचा गाडा पूर्वपदावर आणताना दिसली. यातच आता तिनं कारकिर्दीत एक दमदार कामगिरी केल्यामुळं तिचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 

शहनाजनं घेतलेली ही झेप अर्थातच तिच्या मानसिक आरोग्यासाठीही तितकीच सकारात्मक उर्जा देणारी ठरली असणार यात शंका नाही. शहनाज गिल, दिलजीत दोसांज आणि सोनम बाजवा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा 'हौसला रख' हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. शुक्रवार आणि शनिवारी या चित्रपटानं दमदार कमाई केली. ज्यानंतर रविवारी चित्रपटाच्या कमाईत 6.50 रुपयांची भर पडली. ज्यामुळं पहिल्याच विकेंडला या चित्रपटाच्या खात्यात 17.5 कोटींचा गल्ला जमला आहे. 

चित्रपटाच्या कमाईचा आकडा हा अतिशय मोठा असून, चित्रपट विश्वेषकांनी वर्तवलेल्या अंदाजाच्याही पलीकडे आहे. त्यामुळं संपूर्ण चित्रपटाची टीम सध्या कमालीची आनंदात आहे. 

चाहत्यांनी सोनम आणि दिलजीतची प्रशंसा तर केलीच आहे. पण, या साऱ्य़ामध्ये अधिक कौतुक होत आहे ते म्हणजे अभिनेत्री शहनाज गिल हिचं. मागचा काही काळ शहनाजसाठी आव्हानाचा काळ ठरला. पण, त्यातूनही आता झालं सारंकाही एकवटून बाजूला सारत ती जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे हेच खरं.