'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या ऑफिसवर कस्टम विभागाचा छापा, स्टाफ मेंबरला अटक; 35 लाखांचे ड्रग्ज जप्त

अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) पुन्हा एकदा वादात अडकला आहे. कस्टम विभागाने (Custom Department) मुंबईमधील त्याच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. यादरम्यान ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली.   

शिवराज यादव | Updated: Oct 9, 2024, 09:09 PM IST
'या' बॉलिवूड अभिनेत्याच्या ऑफिसवर कस्टम विभागाचा छापा, स्टाफ मेंबरला अटक; 35 लाखांचे ड्रग्ज जप्त

अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) पुन्हा एकदा अडचणीत सापडताना दिसत आहे. मंगळवारी 8 ऑक्टोबरला कस्टम विभागाने ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात त्याच्या कार्यलायात छापा टाकला. मिळालेल्या माहितीनुसार, एजाज खानच्या कार्यालयातून 35 लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. यादरम्यान ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली. एजाज खानने मात्र अद्याप या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.  

Add Zee News as a Preferred Source

एजाज खान स्वत: 2023 मध्ये जामिनावर बाहेर आला होता. पण या छापेमारीनंतर पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या केसची पाळमुळं युरोपमधून मागवण्यात आलेल्या ड्रग्जशी जोडली जात आहेत. पोलिसांनी अद्याप या प्रकरणी काही माहिती दिलेली नाही. 

एजाज खानच्या कार्यालयावर छापा

'मिड-डे'च्या वृत्तानुसार, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी अंधेरीमधील वीरा देसाई रोडवर असलेल्या कार्यालयावर छापा टाकला. येथून अधिकाऱ्यांनी 100 ग्रॅम MDMA जप्त केलं आहे. या ड्रगची किंमत सुमारे 35 लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. एजाज खानच्या  नातेवाईकाच्या नावावर हे कार्यालय घेण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

ऑफिसमधील कर्मचाऱ्याला अटक

रिपोर्टमध्ये कऱण्यात आलेल्या दाव्यानुसार, ही प्रॉपर्टी भाड्यावर घेण्यात आली होती. येथे एजाज खानच्या ऑफिसशी संबधित एका व्यक्तीने युरोपमधून ड्रग्ज मागवले. सूरज गौड नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याला 9 ऑक्टोबरला कोर्टात सादर करण्यात आलं असंही बोललं जात आहे. 

एजाज खान जामिनावर बाहेर

विशेष म्हणजे एजाज खान स्वत: ड्रग्जच्या केसमध्ये अडकला होता. 2021 मध्ये पोलिसांनी मुंबई विमानतळावरुन त्याला अटक केली होती. यानंतर 2023 मध्ये त्याला जामीन मिळाला होता. याआधी 2018 मध्येही त्याच्यावर असे आरोप लागले होते. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More