लग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'

अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्रीसोबत काम केलं आहे. दरम्यान, अभिनेत्याने विवाहित अभिनेत्रींना सल्ला देणारा व्हिडीओ शेअर केला आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Oct 9, 2024, 08:12 PM IST
लग्नानंतर अभिनेत्री अभिनय का सोडतात? अक्षयने सांगितलं नेमकं कारण, म्हणाला 'तुमची फिगर...'

Akshay Kumar : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अक्षय कुमार पहिल्यापासून महिलांच्या प्रश्नांवर मोकळेपणाने बोलताना दिसला आहे. अलीकडेच त्याचा एका जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो लग्नानंतरच्या महिलांच्या करिअरबद्दल आपले मत मांडत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमारने लग्नानंतर अभिनेत्रींचे काय होते हे सांगितले आहे.

Add Zee News as a Preferred Source

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार त्याचा अनुभव शेअर करताना म्हणाला की, 'मला असं वाटत नाही पण मुळात असं होतं की लग्नानंतर अभिनेत्री काम करणं बंद करतात किंवा त्यांचा नवरा काम करणं थांबवतो. म्हणूनच अभिनेत्री इंडस्ट्री सोडतात किंवा निघून जातात. गेल्या काही वर्षांमध्ये मी इंडस्ट्रीमध्ये हेच बघत आलो आहे.

विवाहित अभिनेत्रींना अक्षयने काय दिला सल्ला? 

अक्षय कुमार म्हणाला की, 'मला वाटते की ती अजूनही पुढे जाऊ शकते. तिने तिच्या फिगर मेंटेन ठेवली पाहिजे. शेवटी ती अभिनेत्री आहे. ती पुढे जाऊ शकते. इतकी वर्षे ती पुढे जात आहे. लग्नानंतरही ती पुढे जाऊ शकते आणि लग्नानंतरही अनेक अभिनेत्री आहेत ज्या स्वत:ला खूप चांगल्या प्रकारे सांभाळतात.

लग्नानंतरही अभिनेत्री त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकतात. असा विचार व्यक्त करून अक्षय कुमारच्या या विधानाने 1990 च्या दशकात चित्रपटसृष्टीतील लैंगिक भूमिकांबाबत महत्त्वाचा संवाद सुरू झाला.

ट्विंकल खन्नाचे युटूब चॅनेल

अभिनेता अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर देखील ट्विंकल खन्नाने तिचे काम सुरु ठेवले होते. जरी ट्विंकल चित्रपटांमध्ये दिसली नसली तरी, तिने स्वतःचे 'Tweak India'नावाचे युटूब चॅनेल सुरु केले. ट्विंकल खन्नाची ही डिजिटल मीडिया कंपनी आधुनिक भारतीय महिलांना वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्याची आणि त्यांची मते मांडण्याची संधी देते.

About the Author

Soneshwar Patil

सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.

...Read More