मी कुठे चुकलो, अभिनेत्याच्या वडिलांना अश्रू अनावर

चित्रपटातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Updated: Dec 6, 2021, 03:27 PM IST
मी कुठे चुकलो, अभिनेत्याच्या वडिलांना अश्रू अनावर

मुंबई : आपल्या गोंडस हास्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता आर माधवनचं आजही लोकांच्या हृदयात एक खास स्थान आहे. अभिनेता नुकताच कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनेलवर दिसला, जिथे माधवनने त्याच्या बालपणीच्या अनेक गोष्टी शेअर केल्या.

त्याने सांगितले की, त्याचे संपूर्ण कुटुंब नोकरदार आहे आणि माधवननेही तोच मार्ग स्वीकारावा अशी कुटुंबातील सदस्यांची इच्छा होती. मात्र माधवनने नोकरीसंदर्भातील ही कौटुंबिक परंपरा मोडून काढत अभिनय क्षेत्रात करिअर निवडले. त्याच्या या वागण्याने अभिनेत्याचे वडील चांगलेच संतापले.

बाबांना इंजिनियर व्हायचे होते: आर माधवन

माधवनने सविस्तरपणे सांगितले. तो म्हणतो- '3 इडियट्स चित्रपटाचा सीन पूर्णपणे माझ्या आयुष्यातील आहे. माझ्या वडिलांची आणि आईची इच्छा होती की मी परत इंजिनियर व्हावे आणि TATA साठी काम करावे आणि तिथे स्थायिक व्हावे.

पण मला आधीच माहीत होतं की जमशेदपूरमध्ये मी 30 वर्षे तेच काम करू शकत नाही, जे माझ्या वडिलांनी सहज केले. ते अस्वस्थ होते, पण माझे वडील रडत होते. आणि मला आठवते की ते काय म्हणाले, 'मला आश्चर्य वाटते की मी तुमच्यासोबत काय चूकीचं केलं आहे.'

माधवनचे लोकप्रिय चित्रपट

आर माधवनने आयुष्यातील बरीच वर्षे जमशेदपूरमध्ये घालवली, त्यानंतर तो करिअर करण्यासाठी बाहेर पडला. मणिरत्नम यांच्या 'अलापयुथे' या चित्रपटातून त्यांना चित्रपटांमध्ये ब्रेक मिळाला. माधवन केवळ साऊथ सिनेमातच नाही तर हिंदी प्रेक्षकांमध्येही खूप लोकप्रिय आहे. रेहना है तेरे दिल में या चित्रपटातून त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

रंग दे बसंती, गुरु, 13B, 3 इडियट्स, तनु वेड्स मनू, तनु वेड्स मनु रिटर्न्स, विक्रम वेधा इत्यादी त्याच्या इतर चित्रपटांचा समावेश आहे. मारा या तमिळ चित्रपटात तो शेवटचा दिसला होता. माधवनच्या आगामी चित्रपटांमध्ये रॉकेट्री: द नंबी इफेक्ट, अमेरिकन पंडित, धोका आणि द रेल्वे मेन या मालिकांचा समावेश आहे.