R. Madhavan नं ज्याच्यासाठी देश सोडला, तोच मुलगा त्याचं नाव लावायला का देतोय नकार ?

त्यानं आपल्या वडिलांचं नाव घेत असं वक्तव्य केलं, की सर्वांच्यात नजरा वळल्या.   

Updated: May 4, 2022, 03:02 PM IST
R. Madhavan नं ज्याच्यासाठी देश सोडला, तोच मुलगा त्याचं नाव लावायला का देतोय नकार ?  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता आर. माधवन याच्यापेक्षा सध्या त्याच्या मुलाचीच चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया असो किंवा मग क्रीडा क्षेत्र. प्रत्येक ठिकाणी माधवनचा मुलगा वेदांत याच्याच नावाची वाहवा होताना दिसत आहे. अर्थात त्यामागे कारणंही तसंच आहे. (R. Madhavans son)

आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटू असणाऱ्या आर माधवनच्या लेकानं नुकतंच त्याचे विचार सर्वांपुढे मांडले. यावेळी त्यानं आपल्या वडिलांचं नाव घेत असं वक्तव्य केलं, की सर्वांच्यात नजरा वळल्या. 

काय म्हणाला, वेदांत ? 
एका राष्ट्रीय वाहिनीला दिलेल्या मुलाखतीबद्दल सांगताना वेदांत म्हणाला, 'मला माझ्या वडिलांच्या छत्रछाय़ेखाली रहायचं नाहीये. मला माझी स्वत:ची ओळख तयार करायची आहे, नाव कमवायचं आहे. फक्त आर. माधवनचा मुलगा, अशीच ओळख मला नकोय.'

आपल्यासाठी आईवडिलांनी घेतलेली मेहनत अधोरेखित करत त्यांनी माझ्यासाठी देश सोडत दुबईला जाण्याचा निर्णय घेतला, ही सर्वात मोठी तडजोड होती; असंही तो म्हणाला. 

मागील वर्षीच आर. माधवन आणि त्याचं कुटुंब दुबईला वास्तव्यास गेलं. वेदांतला आगामी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सरावात कोणतीची अडचण येऊ नये, यासाठीच या अभिनेत्यानं आणि त्याच्या कुटुंबानं इतका मोठा निर्णय घेतला होता. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

दरम्यान, बऱ्याच सेलिब्रिटींची मुलं त्याच्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत कलाजगतामध्येच करिअर घडवण्याच्या वाटा निवडतात. पण, वेदांत याला अपवाद ठरला आहे. त्यानं कारकिर्द घडवण्यासाठी क्रीडा क्षेत्राचा पर्याय निवडत त्यामध्ये दैदिप्यमान कामगिरी करण्याचं सत्र सुरु केलं आहे. मुख्य म्हणजे लेकानं आपल्याप्रमाणं कलाजगताची निवड नाही केली याची माधनवलाही कोणतीही खंत नाही. 

उलटपक्षी एका नवख्या आणि वेगळ्या क्षेत्रात तो करत असलेली कामगिरी पाहून त्याचाही ऊर अभिमानानं भरला आहे.