मुख्यमंत्र्यांचे आभार, 5 झाडं प्रत्येकाने 'आरे'त लावा - सयाजी शिंदे

'आरे'त राबवली जाते अनोखी मोहिम 

Updated: Dec 2, 2019, 12:40 PM IST
मुख्यमंत्र्यांचे आभार, 5 झाडं प्रत्येकाने 'आरे'त लावा - सयाजी शिंदे

मुंबई : नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर सर्वच स्तरावरून त्यांच कौतुक होत आहे. असं असताना अभिनेता आणि झाडप्रेमी सयाजी शिंदे यांनी देखील मुख्यमंत्र्यांचे आभार मानून अभिनंदन केलं आहे. सयाजी शिंदे यांनी 'आरे'मध्ये नवी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. 

पुढील आदेशापर्यंत आरे कॉलनीतील एक पानही तो़डू देणार नाही. असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे. या निर्णयाचं सर्वाच स्तरावरून कौतुक होत आहे. त्याचप्रमाणे दर रविवारी आम्ही आरेमध्ये झाडे लावण्याचा कार्यक्रम करतो. ज्यांना या कामात सहभागी व्हायचंय त्यांनी दर रविवारी हा उपक्रम राबवला जातो. यावेळी येताना आपली पाच झाडं सोबत घेऊन येण्याचं आवाहन सयाजी शिंदे यांनी लोकांना केलं आहे. (मुंबईतील आरे मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती - उद्धव ठाकरे)

तसेच आरेमध्ये प्लास्टिकमुक्त आणि झाडेयुक्त अशी नवीन मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा सयाजी शिंदेंनी व्यक्त केली. आरेमध्ये कारशेड व्हावं किंवा न व्हावं, मेट्रो व्हावी की नाही हा शासनाचा निर्णय आहे. पण विकासाच्या नावाखाली झाडं तोडली जाऊ नयते. उद्धव ठाकरे यांच्या आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, या विधानाचं आम्ही महाराष्ट्रातील झाड लावणाऱ्यांच्यावतीने स्वागत करतो, असं देखील ते म्हणाले. (उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय; आरे आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश)

'रातोरात झालेली कत्तल मान्य नाही. आरेमधील एकही पान तोडू दिलं जाणार नाही.' अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. भाजप सरकारच्या काळातील या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोख लावली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला विरोध नसल्याचं ही त्यांनी म्हटलं आहे.