....आणि आलियाच्या भावनांचा बांध फुटला

गेल्या काही काळापासून आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला वेळ देणाऱ्या..... 

Updated: Dec 2, 2019, 12:24 PM IST
....आणि आलियाच्या भावनांचा बांध फुटला
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : गेल्या काही काळापासून आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला वेळ देणाऱ्या अभिनेत्री आलिया भट्ट  alia bhatt  हिने नुकतंच एका कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम आलियासाठी आणि तिच्या कुटुंबासाठी अतिशय खास होता. अर्थात त्यामागचं कारणंही तसंच होतं. हा कार्यक्रम होता, अभिनेत्री आलिया भट्ट हिची बहीण शाहीन भट्ट shaheen bhatt हिने लिहिलेल्या पुस्तकाच्या अनावरण सोहळ्याचा. 

एकेकाळी नैराश्याचा सामना करणाऱ्या शाहीन या आलियाच्या बहिणीने कशा प्रकारे तिच्या जीवनातील अडचणीच्या प्रसंगाचा कशा प्रकारे सामना केला होता, यावर पुस्तकातून भाष्य करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 'आय हॅव नेव्हर बीन अनहॅपियर' असं नाव असणाऱ्या या पुस्तकाविषयी बोलतेवेळी आलियाला तिच्या भावनांना आवर घालता आला नाही. 

अखेर अश्रूंवाटे तिने भावनांना वाट मोकळी करुन दिली. यावेळी आलियाचं हे भावूक होणं तिच्या शेजारी बसलेल्या शाहीनलाही भावूक करुन गेलं. तिने आलियाला शांत करण्याचा प्रयत्नही केला. 

शाहीनचं हे वागणं पाहून, मला विश्वासच बसत नाही आहे की शाहीन माझी समजूत काढत आहे असं म्हणत नकळतच तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुललं. या दोन्ही बहिणींमधील हे जीवाभावाचं नातं सध्या सोशस मीडियावर चर्चेच आलं आहे.कारण, कार्यक्रमादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिया आणि तिच्या बहिणीचं नातं, कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. या दोन्ही बहिणींमध्ये असणारं प्रेम आणि त्यांच्या नात्यांचे बंध पाहता अनेकांना त्याचा हेवाही वाटतो.