'या' चित्रपटाच्या कमाईतून शाहरुख खानने खरेदी केलं पहिले घर, निर्मात्याकडून घेतली होती संपूर्ण ॲडव्हान्स फी

अभिनेता शाहरुख खानने करिअरच्या अगदी सुरुवातीला पहिले घर विकत घेतले होते. हे घर घेण्यासाठी त्याला तीन वर्षे लागली. या घराचे सर्व श्रेय शाहरुख त्याच्या एका चित्रपटाला द्यायचा. 

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 29, 2024, 05:36 PM IST
'या' चित्रपटाच्या कमाईतून शाहरुख खानने खरेदी केलं पहिले घर, निर्मात्याकडून घेतली होती संपूर्ण ॲडव्हान्स फी title=

Shah Rukh Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला किंग खान म्हणून देखील ओळखले जाते. शाहरुख खानच्या यशाचा पुरावा म्हणजे त्याचे घर मन्नत आहे. शाहरुख खानला ते विकत घेण्यासाठी खूप वेळ लागला होता. त्याला हे घर विकत घेण्यासाठी तीन वर्षे लागली होती. शाहरुखने सुपरस्टार होण्यापूर्वी हे घर खरेदी केले होते. अभिनेत्याने दिवाने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर तो रातोरात प्रसिद्ध झाला. 

शाहरुख खानने हे घर विकत घेण्यासाठी त्याच्या एका चित्रपटासाठी निर्मात्याकडून आगाऊ पैसे घेतले होते. अभिनेता मुकेश खन्ना यांनी याबाबत खुलासा केला होता. 

मुकेश खन्नाकडून खुलासा

मुकेश खन्नाने त्याच्या 'भीष्म इंटरनेशनल' यूट्यूब चॅनेलवरून शाहरुख खानने पहिले घर खरेदी केल्याचे सांगितले होते. अभिनेता शाहरुख खानने मुकेश खन्नासोबत 'गुड्डु' या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. मुकेश खन्ना म्हणाले, शाहरुख खान ज्येष्ठ अभिनेत्यांचा खूप आदर करायचा. 'गुड्डु' चित्रपटादरम्यान शाहरुख खानला घर खरेदी करावे लागले होते. त्यावेळी त्याने निर्मात्याला सर्व पैसे ॲडव्हान्स देण्याची विनंती केली होती. 

मुकेश खन्ना म्हणाला की, शाहरुख खान त्यावेळी घर खरेदी करणार होता. मला घर घ्यायचे आहे, कृपया मला पैसे द्या, असे त्याने निर्माते प्रेम लालवानी यांना सांगितले. त्यावेळी 34-35 लाख रुपयांना त्याने घर विकत घेतले होते. 'गुड्डु' चित्रपटातून मिळालेल्या पैशातून शाहरुख खानने पहिले घर विकत घेतले. या चित्रपटामुळे माझ्याकडे घर आहे. असं शाहरुख खान अनेकदा म्हणायचा. 

शाहरुख खान 'किंग'मध्ये दिसणार

अभिनेता शाहरुख खानचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. लवकरच शाहरुख खान हा सुजॉय घोषच्या 'किंग' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत त्याची मुलगी सुहाना खान देखील दिसणार आहे. शाहरुख खान आणि सुहाना खानला एकत्र पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत.