Mr 360 किती श्रीमंत आहे माहितीये का? सूर्यकुमारचं घर, गाड्या अन् एकूण संपत्ती पाहिली का?

एकेकाळी अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची एकूण संपत्ती आता कोट्यवधीच्या घरात आहे. 

पुजा पवार | Updated: Sep 14, 2024, 12:48 PM IST
Mr 360 किती श्रीमंत आहे माहितीये का? सूर्यकुमारचं घर, गाड्या अन् एकूण संपत्ती पाहिली का? title=
(Photo Credit : Social Media)

Surykumar Yadav Networth : भारताचा स्टार फलंदाज आणि 'मिस्टर 360' म्हणून प्रसिद्ध असणारा सूर्यकुमार यादव शनिवारी 14 सप्टेंबर रोजी 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. भारताला टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकवून देण्यात सूर्याचे मोलाचे योगदान होते. शेवटच्या ओव्हरला त्याने पकडलेला अफलातून कॅच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नेहमी स्मरणात राहील. सूर्यकुमार टी 20 क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक असून त्याच्याकडे भविष्यात टी 20 क्रिकेटच्या कर्णधारपदाची जबाबदारी सुद्धा सोपवली जाऊ शकते. 

उत्तर प्रदेशातील अतिशय साधारण कुटुंबात जन्मलेल्या सूर्यकुमार यादवने वयाच्या 10 व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता. अखेर 2021 मध्ये वयाच्या 31  व्या वर्षी त्याला टीम इंडियाकडून वनडे आणि टी 20 संघात पदार्पणाची संधी मिळाली. सूर्यकुमार यादवकडे बीसीसीआयचे आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स फ्रेंचायझी सोबत कॉन्ट्रॅक्ट सुद्धा आहे. तसेच सूर्या जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. तेव्हा एकेकाळी अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेल्या टीम इंडियाच्या या स्टार खेळाडूची एकूण संपत्ती ही कोट्यवधीच्या घरात आहे. 

आयपीएलमधून कमावतो कोट्यवधी

रिपोर्ट्सनुसार सूर्यकुमार यादवची एकूण नेटवर्थ ही जवळपास 55 कोटींपेक्षा अधिक आहे. त्याच्या कमाईतील सर्वात जास्त वाटा हा बीसीसीआय कॉन्ट्रॅक्ट आणि आयपीएलमधून होत असतो. सूर्यकुमार यादव हा आयपीएलची सर्वात मोठी फ्रेंचायझी असलेल्या मुंबई इंडियन्स सोबत खेळतोय. फ्रेंचायझीकडून त्याला आयपीएलसाठी प्रत्येक वर्षी 9 कोटी रुपये मिळतात. तसेच सूर्याकडे बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट असून यात बी कॅटेगरीमध्ये त्याचा समावेश आले. त्यामुळे सूर्याला वर्षाला बीसीसीआयकडून 3 कोटी रुपये मिळतात. याशिवाय जाहिराती ब्रँड एंडोर्समेंट्स आणि काही स्टार्टअपमध्ये सुद्धा सूर्याने गुंतवणूक केली आहे ज्यातून त्याला लाभ होती. 

हेही वाचा : लोणच्या ऐवजी चुकून 'झुरळ' खाणार होता विराट, नेमका काय आहे किस्सा? हसून हसून तुमच्याही पोटात दुखेल

 

मुंबईत आलिशान घर :

सूर्यकुमार यादव हा मुंबईतील चेंबूर या भागात राहत असून येथील अणुशक्ति नगरमध्ये त्याचे आलिशान घर आहे. सूर्यकुमार यादवच्या या घराची किंमत कोटींमध्ये असून यासह देशातील वेगवेगळ्या भागात त्याने प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली आहे. 

लग्झरी कार कलेक्शन : 

सूर्यकुमार यादव हा अनेक लग्झरी गाड्यांचा चाहता आहे. त्याच्या जवळ BMW XM, Range Rover Velar, Mercedes-Benz, Nissan Jonga, Mini Cooper S, Skoda  Superb अशा अनेक गाड्यांचं कलेक्शन आहे.