का व्हायरल होतोय मंदिरा बेदीचा 'तो' बोल्ड सीन?

बोल्ड सीन व्हायरल होण्यासाठी मंदिरा नव्हे तर ....

Updated: Oct 20, 2021, 08:56 AM IST
का व्हायरल होतोय मंदिरा बेदीचा 'तो' बोल्ड सीन?
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी ही तिच्या फिटनेससोबतच मादक अदांसाठीही ओळखली जाते. काळानुरुप मंदिरा कायमच चाहत्यांच्या मनाचा ठाव घेताना दिसली. अशी ही अभिनेत्री आता म्हणे एका बोल्ड सीनमुळं चर्चेत आली आहे. जो कमालीचा व्हायरल होत आहे. बरं, हा बोल्ड सीन व्हायरल होण्यासाठी मंदिरा नव्हे तर तिच्यासोबत झळकणारा अभिनेता ठरत आहे. 

बोल्ड सीनमध्ये दिसणारा हा चेहरा आहे, अभिनेता सुधांशू पांडेचा. मालिकेच्या निमित्तानं सुधांशू प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. याचदरम्यान, त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे, त्यानं अनेक चित्रपटांमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. मंदिरा बेदी ही त्यापैकीच एक. 

2007 मध्ये आलेल्या 'मॅट्रीमोनी' शॉर्टफिल्ममध्ये ते झळकले होते. यामध्ये विवाहित मंदिराशी नातं असल्याचा प्लॉट दाखवण्यात आला होता. इथं मध्यवर्ती भूमिकेत अभिनेता अरबाज खान आणि मंदिरा बेदी झळकले होते. त्यांनी पती- पत्नीची भूमिका साकारली होती. 

'अनुपमा'मुळं चर्चेत आलेल्या सुधांशू पांडेनं बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2000 या वर्षी त्यानं चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. कलाजगतासोबतच तो आपल्या कुटुंबाचीही तितकीच काळजी घेताना दिसतो. मोना पांडे असं त्याच्या पत्नीचं नाव असून, या जोडीला दोन मुलं आहेत. वयाच्या 19 व्या वर्षीच सुधांशूनं मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. यानंतर मात्र त्यानं कधीच मागे वळून पाहिलं नव्हतं.