दीपिकाचा Ex Boyfriend आणि पती एकत्र; पुढे काय होणार?

Ex Boyfriend आणि पती आमने-सामने आल्यानंतर....

Updated: Oct 20, 2021, 08:55 AM IST
दीपिकाचा Ex Boyfriend आणि पती एकत्र; पुढे काय होणार?

मुंबई : अभिनेत्री दीपिका पादुकोनने अभिनेता  रणवीर सिंग अनेकांसाठी पॉवर कपल आहे. अनेक ठिकाणी दोघे एकमेकांचं कौतुक करत असतात. शिवाय सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत कपल गोल्स देत असतात. रणवीरसोबत लग्न करण्याआधी दीपिकाचं नाव अनेकांसोबत जोडण्यात आलं. त्यातील एक म्हणजे अभिनेता  रणबीर कपूर.  आता रणवीर आणि रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करताना प्रेक्षकांना दिसू शकतात. कारण अशी इच्छा खुद्द अभिनेता कार्तिक आर्यनने व्यक्त केली आहे.

सध्या कार्तिकच्या "धमाका" चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. 19 ऑक्टोबर रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षक देखील चित्रपटाबद्दल फार उत्सुक आहेत. "धमाका" चित्रपटानंतर "प्यार का पंचनामा 3" चित्रपट पाईपलाईनमध्ये आहे की नाही? आणि चित्रपटत मुख्य भूमिकेत कोण दिसेल?असा प्रश्न कार्तिकला विचारण्यात आला. 

प्रश्नाचं उत्तर देताना कार्तिक गोंधळला आणि म्हणाला, 'मी आणि रणबीर फुटबॉल खेळतो.... ज्यामध्ये रणवीर सिंग देखील येतो... जर आमची ही जोडी एकत्र आली तर मला फार आनंद होईल... मला असं वाटत आहे की यासंबंधी मला लव रंजन सर यांच्यासोबत विचारणा करावी लागणार आहे...' तर 'प्यार का पंचनामा 3'मध्ये कोणती जोडी झळकणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

कार्तिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर,  तो लवकरचं 'लव रंजन' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात मृणाल ठाकूर आणि अमृता सुभाष मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट दहशवादी हल्ल्यांवर आधारित आहे. चित्रपटात कार्तिक आर्यन पत्रकार अर्जुन पाठकची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपट 19 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.