तुझ्यासवे हे शतजन्मीचे हे माझे नाते; विराजस- शिवानीच्या लग्नसोहळ्याचे नजर रोखणारे Photo

आणखी एका सेलिब्रिटी विवाहसोहळ्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या

Updated: May 4, 2022, 11:41 AM IST
तुझ्यासवे हे शतजन्मीचे हे माझे नाते; विराजस- शिवानीच्या लग्नसोहळ्याचे नजर रोखणारे Photo  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : तिथे (Ranbir Alia) रणबीर- आलियाच्या लग्नाची हवा धुसर होत नाही, तोच आणखी एका सेलिब्रिटी विवाहसोहळ्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. खरंतर वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा रोखल्या असंच म्हणावं लागेल. (Virajas Kulkarni shivani rangole wedding)

अतिशय सुरेख अशा पद्धतीनं विवाहबंधनात अडकणारी ही जोडी म्हणजे अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांची. 

मैत्री, प्रेम आणि मग लग्न... अशा टप्प्यांवरून नातं पुढे नेणाऱ्या या जोडीचे फोटो पाहताना अनेकांनाच त्यांचा हेवा वाटला. लेकाच्या लग्नात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यासुद्धा प्रचंड आनंदात दिसल्या. 

विराजस आणि शिवानी या दोघांनीही सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही क्षण चाहत्यांच्या भेटीला आणले. इथं त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद पाहण्याजोगा ठरत आहे. शिवानी आणि विराजसचं एकमेकांच्या नजरेत पाहत असताना जाणवणारं प्रेम तुमच्या आमच्या मनालाही हात घालत आहे. 

शिवानी आणि विराजसनं लग्नासाठी दाक्षिणात्य लूकला पसंती दिली होती. शिवानीनं नेसलेल्या भरजरी कांजीवरम साडीवर तिनं टेंपल ज्वेलरीची जोड दिल्याचं पाहायला मिळालं. तर विराजसनं कुर्ता आणि मुंडू म्हणजेच दाक्षिणात्य पद्धतीचं गोल धोतर नेसण्याला पसंती दिल्याचं फोटो पाहून लक्षात आलं. 

कुटुंबीय, खास मित्रपरिवाराच्या उपस्थितीत या जोडीनं त्यांच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली. सोशल मीडियावर ज्या क्षणी त्यांच्या लग्नाचे फोटो चाहत्यांच्या नजरेत आले, तेव्हापासूनच सर्वांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. 

काय मग, ही नवी जोडी तुम्हाला कशी वाटली ? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...