अभिनेत्री अमृता खानविलकरची गुडन्यूज; सोशल मीडियावर केला खुलासा

अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. 

Updated: Sep 19, 2022, 07:18 PM IST
अभिनेत्री अमृता खानविलकरची गुडन्यूज; सोशल मीडियावर केला खुलासा title=

मुंबई : अभिनेत्री अमृता खानविलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काहि दिवसांपूर्वी तिचा रिलीज झालेला 'चंद्रमुखी' सिनेमाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. आपल्या डान्स आणि अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री चर्चेत असते. पण यावेळी ही अभिनेत्री पुन्हा एकदा एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.  

अमृताने सोशल मीडियावर तिला युट्यूब सिल्व्हर बटन मिळालं असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तिच्या या पोस्टवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडत असल्याचंही दिसत आहे.

गेले काहि दिवस बिगबॉस 16 मध्ये मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरचासुद्धा समावेश होणार असल्याचं बोललं जात होतं अमृता गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपट आणि रिऍलिटी शोमध्ये सक्रिय झाली आहे. ती सध्या 'झलक दिखला जा' या डान्स रिएलिटी शोमध्ये दिसून येत आहे. तिने तिच्या नृत्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. 

मात्र आता अभिनेत्रीने बिग बॉसबाबत एक मोठा खुलासा केला आहे. अमृताला बिग बॉसमध्ये येण्याची इच्छा आहे. तिला अनेकवेळा ऑफरसुद्धा मिळाली आहे. परंतु एका कारणामुळे ती बिग बॉसमध्ये अद्याप सहभागी झालेली नाहीये. (Actress Amruta Khanwilkar shared good news on social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दिलेल्या एका मुलाखतीत अमृता खानविलकरने सांगितलं की, तिला बिग बॉसची ऑफर मिळत आहे. परंतु मी निर्मात्यांना सांगते की, जेव्हा माझा पती मला जा म्हणून सांगेल तेव्हाच मी सहभागी होईन.

माझ्या कामाबाबत तो खूप सजग असतो. मी कसं काम करत आहे. डान्स रिहर्सल करतेय की नाही या सर्वांवर त्याच बारकाईने लक्ष असतं. ते मला प्रोत्साहन देत असतात. त्यामुळे जेव्हा पती हिमांशू सांगेल तेव्हा अमृता बिग बॉसमध्ये दिसू शकते.