अनन्याचा माज पाहून तुम्हीही म्हणाल... किती हा attitude!

 रम्या कृष्णन या फोटो काढण्यासाठी अनन्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या परंतु अनन्या मात्र त्याच्या बाजूने त्यांच्याकडे न पाहता निघून आत गेली.

Updated: Aug 11, 2022, 10:49 PM IST
अनन्याचा माज पाहून तुम्हीही म्हणाल... किती हा attitude! title=

Ananya Pandey: सध्या अनन्या पांडे आणि अभिनेता विजय देवरकोंडा एकत्रितपणे आपल्या 'लायगर' या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहेत. नुकत्याच एका प्रमोशन दरम्यान अनन्या आणि विजयसह चित्रपटातील सहकलाकार  रम्या कृष्णनही तिथे उपस्थित होत्या परंतु प्रमोशनच्या वेळी फोटो काढताना मात्र अनन्याने रामया यांनी चक्क दुर्लक्षित केले. 

रम्या कृष्णन या फोटो काढण्यासाठी अनन्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या परंतु अनन्या मात्र त्याच्या बाजूने त्यांच्याकडे न पाहता निघून आत गेली. अनन्याच्या या वर्तनामुळे ट्रोलर्सनी तिच्या चांगलंच सुनावले आहे. अनन्याला किती attitude आहे असेच सवाल लोकांनी कमेंट्स सेक्शनमधून केले आहेत. 

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या त्यांच्या आगामी 'लायगर' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आजकाल चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट या संपूर्ण भारत चित्रपटाचे ठिकठिकाणी प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडा पाटण्याच्या रस्त्यांवर चहाची चुस्की घेताना दिसला होता.

साऊथ सुपरस्टार विजय आणि बॉलीवूड अभिनेत्री अनन्या यांच्या चित्रपटाची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे तसतसे चित्रपटाचे प्रमोशन जोरात होत आहे. गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा या दोन मोठ्या शहरात 'लाइगर'चे प्रमोशन केल्यानंतर चित्रपटाची संपूर्ण टीम मुंबईतील जुहू येथे पोहोचली. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विजय, अनन्या आणि रम्या कृष्णन दिसत आहेत.