अंकिता लोखंडे राज्यपालांच्या भेटीला, वाचा काय आहे कारण?

अंकिता लोखंडे आणि राज्यपालांची भेट... चर्चांना उधाण  

Updated: Dec 6, 2021, 04:18 PM IST
अंकिता लोखंडे राज्यपालांच्या भेटीला, वाचा काय आहे कारण? title=

मुंबई : 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री अंकिता लोखंडेने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आहे. अंकिताने राज्यपाल कोश्यारी यांची भेट का घेतली असावी? अशी चर्चा जोर धरत आहे. अंकिता लवकरचं विवाह बंधनात अडकणार आहे. यामुळे लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकिता होणाऱ्या पती सोबत राज भवनावर पोहोचली. कोश्यारी यांना लग्न पत्रिका देतानाचे काही फोटो अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. 

अंकिताने या खास क्षणाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये, 'महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्याची संधी मिळाल्याबद्दल मी आभारी आहे . मला माहीत आहे की तुम्ही खूप व्यस्त आहात सर. असताना तुम्हा आम्हाला वेळ दिलात म्हणून कृतज्ञ व्यक्त करत आहे.' असं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अंकिताची जवळच्या व्यक्तीने एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, अंकिता आणि विकी जैनचा विवाह सोहळा 12 डिसेंबर ते 14 डिसेंबरपर्यंत रंगणार आहे. या विवाह सोहळ्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांच्या लग्नाची पत्रिका  व्हायरल झाली. 

अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या लग्नपत्रिकेचे आता वाटप सुरू झाले आहे. लग्नाची पत्रिका अभिनेत्री श्रद्धा आर्यला देण्यात आली आहे. श्रद्धा आर्यने चाहत्यांसोबत अंकिताच्या पत्रिकेची एक झलक शेअर केली आहे.