धक्कादायक.. 21 वर्षीय अभनेत्रीची आत्महत्या, बॉयफ्रेंडमुळे संपवलं जीवन?

बॉयफ्रेंडमुळे घडलेल्या 'त्या' घटनेमुळे 21 वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या  

Updated: May 26, 2022, 01:33 PM IST
धक्कादायक.. 21 वर्षीय अभनेत्रीची आत्महत्या, बॉयफ्रेंडमुळे संपवलं जीवन? title=

मुंबई : कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मॉडेल आणि अभिनेत्री बिदिशा मजूमदारने गळफास घेत जीवन संपवलं आहे. बुधवारी बिदिशाचा मृतदेह तिच्या फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. उभरती मॉडेल आणि अभिनेत्रीच्या आत्महत्येच्या बातमीने 
बंगाली मनोरंजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.  बिदिशा नगर मार्केटमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायची आणि तिथेच तिने आत्महत्या केली. 

बुधवारी संध्याकाळी पोलिसांना अभिनेत्रीचा मृतदेह फ्लॅटमध्ये लटकलेल्या अवस्थेत सापडला. फ्लॅटचा दरवाजा आतून बंद होता, तो तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि बिदिशाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

पोलिसांनी मिळाली सुसाईड नोट... 
रिपोर्टनुसार, बिदिशा 4 महिन्यांपूर्वीच नागर बाजारमध्ये राहू लागली होती. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बिदिशाच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली आहे.

बॉयफ्रेंडमुळे संपवलं जीवन
बिदिशाच्या मित्रांच्या मित्रांना दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री बॉयफ्रेंडमुळे डिप्रेशनमध्ये होती. बिदिशाची जवळची मैत्रीण दिया दास हिने सांगितलं, ती डिप्रेशनमध्ये होती. 

बिदिशाचा बॉयफ्रेंड Anubhab याच्या आणखी 3 मैत्रिणी होत्या. बिदिशाला बॉयफ्रेंडचं इतर मुलींसोबत असलेलं नातं मान्य नव्हतं. या प्रकरणामुळे ती डिप्रेशनमध्ये होती. 

बिदिशाने सुसाईड नोटमध्ये त्याने कॅन्सरने ग्रस्त असल्याचं म्हटलं आहे. पण तिला कॅन्सरसारखा गंभीर आजार नसल्याचं समोर आलं आहे. सध्य पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.